online groceries shopping 
लाइफस्टाइल

किराणा ऑनलाईन मागवत असाल, तर हे वाचा!

किराणा सामान ऑनलाईन मागवण्याकडे अनेकांचा कल असतो

सकाळ डिजिटल टीम

कोरोनामुळे बाहेर पडण्यावर निर्बंध आले. लोकांना त्यानंतर अनेक सवयी बदलाव्या लागल्या.आता तर रोज मास्क घालण्यापासून ते ऑनलाइन (Online Shopping) किराणा सामान खरेदी करण्यापर्यंत, आपण अनेक सवयी बदलल्या आहेत. किंबहुना या सवयी आपल्या जीवनशैलीच्या भाग बनल्या आहेत. आता तर बाहेर जायला वेळ नाही म्हणून म्हणा किंवा कंटाळा आला म्हणून असेल पण किराणा सामान ऑनलाईन मागवण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र एका अभ्यासानुसार मार्केटमधील मोठ्या कंपन्या पॅकींग केलेल्या वस्तूंचं पौष्टिक मूल्य आणि त्यात उपलब्ध असलेल्या घटकांचा उल्लेख करत नाही. त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. (Is Online Grocery Shopping Good?)

असा केला अभ्यास

हा अभ्यास 'पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन'मध्ये प्रकाशित झाला आहे. अभ्यासानुसार, फेडरल नियमांनुसार पॅकेज केलेले पदार्थ किराणा दुकानातून खरेदी करताना ग्राहकांना त्याचे परिक्षण करून आढावा घ्यायचा असतो. त्यामुळे या पदार्थांत उपलब्ध असणारे पौष्टीक घटक आणि साहित्य यांची माहिती त्यांना असणे गरजेचे असते. पण ऑनलाइन किराणा विक्रेते आपल्या काही उत्पादनांची ग्राहकांना हवी असलेली माहिती सूचीबद्ध करत नाहीत, असे अभ्यास सांगतो. त्यामुळे ग्राहकांना प्रोडक्टची योग्य माहिती कळत नाही.

Online Shopping

अभ्यास काय सांगतो?

यावेळी, नऊ ऑनलाइन किरकोळ विक्रेत्यांच्या १० प्रमुख राष्ट्रीय पॅकेज केलेल्या उत्पादनांचा अभ्यास केला गेला. त्यात किरकोळ विक्रेत्यांनी त्यांच्या जवळपास ११ टक्के उत्पादनांची पौष्टिक तत्वे आणि घटक सूची सामाविष्ट केली गेली नव्हती. तसेच ६३ टक्के उत्पादनांमध्ये, अन्नातून होणाऱ्या एलर्जीविषयी कोणतीही माहिती दिली नव्हती.

grocery store

आवश्यक तपशीलाची माहिती देणे गरजेचे

युनायटेड स्टेट्स अन्न आणि औषध प्रशासनाने ग्राहकांना कोणती माहिती असणे आवश्यक आहे हे सांगितले आहे. यामध्ये सर्व्हिंगचे आकार, कॅलरीज, साखरेचे प्रमाण, ऍलर्जी आणि सोडियम, साखर, कर्बोदके, चरबी आणि प्रथिने यांचे दैनिक मूल्य हे घटक समाविष्ट करणे गरजेचे आहे. अभ्यासानुसार, FDA ने ही तफावत कमी करण्यासाठी पावले उचलणे आणि नियमांची तात्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. याआधी, FDA ने कुठल्याही वस्तूची ऑनलाइन पोषण माहिती त्याच्या इन-स्टोअर भागासारखीच असावी असे सांगितले आहे.

online shopping

ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?

ग्राहकांनी उत्पादनामध्ये काय आहे हे समजून घेणे, विशेषत: तयार केलेले उत्पादन कसे आहे ते समजून घेणे खूप गरजेचे आहे. तसेच मुख्य दुकानदारांनी बाजारपेठेत पारदर्शक व्यवहार करणे आवश्यक आहे. यामुळे लोकांना ते काय खरेदी करत आहेत? तसेच ते त्यांच्या आरोग्यासाठी किती चांगले आहे याची जाणीव होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT