Black Hair Colour  sakal
लाइफस्टाइल

Black Hair Colour : शिकेकाईमध्ये या गोष्टी मिसळून लावल्याने केस होतील काळे, 4 आठवड्यात दिसून येईल परिणाम

जसजसे तुमचे वय वाढते तसतसे तुमच्या शरीरात अनेक बदल दिसू लागतात.

सकाळ डिजिटल टीम

जसजसे तुमचे वय वाढते तसतसे तुमच्या शरीरात अनेक बदल दिसू लागतात. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात, केस पांढरे होऊ लागतात. केस पांढरे तर होतातच पण टाळूलाही खाज सुटू लागते. बहुतेक लोक केस काळे करण्यासाठी हेअर डाय लावतात.

डाय लावल्याने केस कोरडे होऊ शकतात. आता प्रश्न असा आहे की केस काळे करण्यासाठी काही उपाय नाही का? तर, तुम्ही घरगुती उपाय करून तुमचे पांढरे केस काळे करू शकता. हा काळा रंग नैसर्गिक दिसेल आणि केस कोरडे होणार नाही. यामुळे केसांची चमक खराब होणार नाही.

केसांची काळजी घेण्यासाठी शिकेकाई वापरणे ही एक सुरक्षित आणि प्रभावी पद्धत आहे. त्यामुळे केस काळे होण्यासोबतच पोषण होण्यास मदत होते. यासोबत एलोवेरा जेल आणि कांद्याची साल वापरणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्हालाही पांढरे केस काळे करायचे असतील तर हे घरगुती उपाय जाणून घ्या.

शिकेकाई, कांद्याची साल आणि एलोवेरा जेल केस काळे करतात...

1. कांद्याची साल

कांद्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि सल्फर असते जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. तसेच केसांचा रंग डार्क होण्यास मदत होते.

2. शिकेकाई

शिकेकाई हे एक नैसर्गिक क्लिंजर आणि कंडिशनर आहे जे केसांची काळजी घेण्यासाठी वापरले जाते. हे टाळू आणि केस स्वच्छ करते, तसेच चमक आणते आणि केसांचे आरोग्य वाढवते.

3. एलोवेरा जेल

एलोवेरा जेल त्याच्या मॉइश्चरायझिंग आणि उपचार गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. त्यात एंजाइम असतात जे निरोगी केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. कोरफड देखील कोंडा कमी करण्यास आणि टाळूचे आरोग्य राखण्यास मदत करते.

शिकेकाई, कांद्याची साल आणि एलोवेरा जेल डाय बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

  • 1/2 कप शिकेकाई

  • 1 कप कांद्याची सालं

  • 1 टीस्पून एलोवेरा जेल

बनवण्याची पद्धत

  • सर्व प्रथम कढईत कांद्याची सालं टाकून ती काळी होईपर्यंत चांगली भाजून घ्या.

  • ब्लेंडरमध्ये कांद्याची सालं, शिकेकाई पावडर आणि एलोवेरा जेल घालून मिक्स करा. तुम्ही शिकेकाईला गरम पाण्यात रात्रभर भिजवून पेस्ट बनवून देखील टाकू शकता.

  • ते कोमट होऊ द्या आणि जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यात एक चमचा खोबरेल तेल देखील घालू शकता. तुमची डाय तयार आहे.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT