food sakal
लाइफस्टाइल

Health tips: ‘या’ पदार्थांमध्ये दुधापेक्षा जास्त असते कॅल्शियम, आरोग्यासाठी खूप फायदेशीर

कॅल्शियम आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे.

Aishwarya Musale

कॅल्शियम आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. आपल्या शरीराला सर्व पोषक तत्वांची गरज असते. शरीराचा पोषक तत्वांशिवाय विकास होणे शक्य नाही. सर्व वयोगटातील लोकांसाठी पोषक तत्वे आवश्यक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॅल्शियम. हा एक प्रकारचा मिनरल आहे, जो हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

शरीरातील 99 टक्के कॅल्शियम हाडे आणि दातांमध्ये आढळते. येथे आम्ही तुम्हाला त्या पदार्थांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये दुधापेक्षा जास्त पोषक तत्वे आढळतात.

टोफू

अनेकदा तुम्ही टोफू खाल्ले असेल. हे कमी चरबी आणि प्रथिनांचे समृद्ध स्त्रोत मानले जाते. तसेच टोफूमध्ये भरपूर कॅल्शियम आढळते. हा वनस्पती आधारित आहार आहे आणि शाकाहारी लोकांसाठी हा बेस्ट पर्याय आहे.

दही

दही हे आंबवलेले अन्न आहे आणि उन्हाळ्यात ते भरपूर खाल्ले जाते. त्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. पण तुम्हाला माहित आहे का की दुधापेक्षा दह्यात जास्त कॅल्शियम आढळते.

नाचणी

नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वाधिक असते. 100 ग्रॅम नाचणीमध्ये 345 मिलीग्राम कॅल्शियम आढळते. आरोग्य तज्ञ म्हणतात की नाचणी आठवड्यातून 4 वेळा खाणे आवश्यक आहे.

ऑरेंज ज्यूस

संत्र्याच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, परंतु ते कॅल्शियमचा एक समृद्ध स्रोत देखील आहे. ज्या लोकांना दूध प्यायला आवडत नाही ते त्यांच्या आहारात संत्र्याच्या ज्यूसचा समावेश करू शकतात.

बिया

भोपळा आणि सूर्यफुलाच्या बियांमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. विशेष म्हणजे या बियांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण दुधापेक्षा जास्त असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : कोकणसह मुंबई, पुण्यात अतिमुसळधार! ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट; मराठवाड्यातही जोरदार पावसाचा इशारा

Latest Marathi News Live Updates : वारणा धरणातून २४६३० क्यूसेक ने विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune Rain: पावसामुळे पुण्याची विमानसेवा विस्कळित; एक विमान हैदराबादला वळविले, तीन विमानांना उशीर

प्रेमप्रकरणाचा भयंकर अंत! ज्याच्यासोबत संसाराची स्वप्नं रंगवली, प्रेयसीने त्यालाच संपवलं, संभाजीनगरात उघड झाला भीषण कट

Kolhapur Rain Red Alert : कोल्हापुरात अतिवृष्टी, घाट माथ्यावर रेड तर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट, किती दिवस संततधार?

SCROLL FOR NEXT