Lipsticks Sakal
लाइफस्टाइल

Lipsticks: उन्हाळ्यात लिपस्टिक फ्रिजमध्ये ठेवणे योग्य आहे का? जाणून घ्या ब्युटी हॅक्स

Lipstick Store Tips: अनेक महिला लिपस्टिक फ्रिजमध्ये ठेवतात. पण सर्वच प्रकारच्या लिपस्टिक फ्रिजमध्ये ठवणे योग्य नसते.

पुजा बोनकिले

can we store lipstick in fridge summer

अनेक महिला सुंदर दिसण्यासाठी मेकअप करतात. ओठांवर लिपस्टिक लावल्याने सौंदर्यात अधिक भर पडते. उन्हाळा सुरू झाला आहे. या दिवसांमध्ये अनेकदा लिपस्टिक स्टोअर करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरण्यात येतात. गरम वातावरणामुळे लिपस्टिक वितळू नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवतात. पण कोणत्या प्रकारच्या लिपस्टिक फ्रिजमध्ये ठेवाव्या आणि असे करणे किती योग्य आहे हे जाणून घेऊया.

  • फ्रिजमध्ये लिपस्टिक ठेवल्यास काय होते

लिपस्टिकचे अनेक प्रकार आहेत आणि सर्व प्रकारच्या लिपस्टिक फ्रीजमध्ये ठेवू शकत नाही. अनेकवेळा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये क्रेयॉन किंवा मॅट लिपस्टिक वितळू शकतात. अशावेळी या लिपस्टिक फ्रीजमध्ये ठेवल्यास त्या चांगल्या राहतात. याशिवाय उन्हाळ्यात ओठांना थंड ठेवण्यासाठी लिपस्टिक फ्रिजमध्ये ठेवली जाते.

  • फ्रिजमध्ये कोणत्या प्रकारची लिपस्टिक ठेवावी?

आजकाल बाजारात लिपस्टिकचे अनेक प्रकार मिळतात. यामध्ये क्रेयॉन आणि लिक्विड प्रोडक्ट मिळतात. क्रेयॉनमध्ये आढळणाऱ्या चकचकीत आणि सेमी मॅट लिपस्टिक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वितळण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता. तुम्ही फ्रिजमध्ये लिक्विडमध्ये फक्त ग्लॉस किंवा शाईन लिपस्टिक ठेवू शकता.

  • कोणत्या प्रकारची लिपस्टिक फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे

लिपस्टिकमध्ये ग्लॉस आणि मॅट फिनिश असे प्रकार असतात. फ्रिजमध्ये फक्त ग्लॉस किंवा शाईन लिपस्टिक ठेवावे. मॅट फिनिश लिपस्टिक चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका. कारण मॅट लिपस्टिकमध्ये कमी तेलकट पदार्थ असतात आणि फ्रीजमध्ये ठेवलेली लिपस्टिक थेट ओठांवर लावल्याने ओठ कोरडे होतात. तुम्हाला लिपस्टिकची योग्य फिनिशिंग मिळू शकणार नाही.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपराष्ट्रपती निवडणुकीत NDAचे अचानक ११ मतदार वाढले, मोठ्या पक्षाचा पाठिंबा; काँग्रेस म्हणते, विश्वासघात

Nepal Protests : नेपाळही बांगलादेशच्या वाटेवर? देशात होणार सत्तापालट? 'या' पाच मागण्यांसह रस्त्यावर उतरले तरुण...

Medical Admission Update : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना ४०० नव्या जागांची मान्यता; यूजी काउन्सिलिंग २०२५ मध्ये समावेश

संगमनेर शहर हादरलं! 'इंदिरानगरमध्ये पत्नीचा खून करून पतीने जीवन संपवले'; दोघांमध्ये वारंवार भांडणे, नेमकं काय घडलं..

Latest Marathi News Updates: धुळ्यात स्कुटी आणि एसटी बसच्या अपघातात शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT