Night Fall sakal
लाइफस्टाइल

Night Fall : स्वप्नात दिसतात लैंगिक दृश्ये; स्वप्नदोषाला कसे सामोरे जाल ?

अशा वेळी शिश्नाला ताठरता न येताही वीर्यस्खलन होते. याला स्वप्नदोष म्हणतात. यामुळे शरीरातील ताकद कमी होत असल्याचा गैरसमज आहे.

नमिता धुरी

मुंबई : तारुण्यात प्रवेश केलेल्या, हस्तमैथुन न करणाऱ्या किंवा नुकतेच लग्न झालेल्या पुरुषांच्या डोक्यात लैंगिक संबंधांविषयी विचार घुटमळत असतात. त्यामुळे रात्री झोपल्यानंतर स्वप्नात लैंगिक दृश्ये दिसतात.

अशा वेळी शिश्नाला ताठरता न येताही वीर्यस्खलन होते. याला स्वप्नदोष म्हणतात. यामुळे शरीरातील ताकद कमी होत असल्याचा गैरसमज आहे. पण असे काहीही होत नाही. ही एक सामान्य नैसर्गिक प्रक्रिया आहे. हेही वाचा - ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

रक्त आणि वीर्य यांचा संबंध नाही

रक्ताचा वीर्याशी काहीही संबंध नाही. वीर्य हे रक्ताने बनलेले नसून ते साखर, पाणी आणि काही जिवंत पेशी यांचे मिश्रण असते आणि त्याची निर्मिती प्रक्रिया शरीरात सतत चालू असते.

अशा स्थितीत जर ते सेक्स किंवा हस्तमैथुनाद्वारे काढले नाही तर ते आपोआप डिस्चार्ज होते. ही एक सामान्य प्रक्रिया आहे.

वैद्यकशास्त्रानुसार हस्तमैथुन ही वाईट गोष्ट नाही जेव्हा त्याचा मानसिक किंवा शारीरिक स्तरावर तुम्हाला त्रास होत नाही. सेक्स ही शारीरिक गरज आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याबद्दल वाईट वाटणे किंवा त्याकडे न्यूनगंडाने पाहणे हे आपल्या स्वतःच्या विचारांवर अवलंबून असते.

रुग्णाला या समस्या जाणवतात

स्वप्नदोषामुळे त्रस्त असलेल्या व्यक्तीला असे वाटू लागते की तो अशक्त होत आहे, त्याच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होत आहेत.

हाडे दुखतात, त्याला वाईट वाटू लागते की आता काय होणार ? त्याला गंभीर आजार झाला आहे का ? त्याचे वैवाहिक जीवन कसे पुढे जाईल ? या सर्व विचारांमुळे त्याची काम करण्याची आवड कमी होते.

स्वप्नदोषास कसे टाळावे ?

जर तुम्हाला स्वप्नदोषाची समस्या जाणवत असेल तर तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ किंवा मानसशास्त्रज्ञांना भेटावे. दिशाभूल करणारी माहिती शक्यतो टाळा. तुमचे शरीर कसे कार्य करते ते समजून घ्या आणि तुमचे शारीरिक ज्ञान वाढवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT