Chaitra Pornima esakal
लाइफस्टाइल

Chaitra Pornima : छत्रपती शाहू महाराजांनी साताऱ्यातल्या पाडळी गावाला सासनकाठीचा मान का दिला?

पाणपीठाचा उपवास म्हणजे काय?

सकाळ डिजिटल टीम

Chaitra Pornima :

दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला अनेक उंचच उंच सासनकाठ्या घेऊन ज्योतिबादेवाकडे पायी जातात. राज्यातून आणि कर्नाटकातून जवळपास १०८ काठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल होतात. देवाची वियजी पताका म्हणून या काठ्या गावागावातून वाटचाल करत ज्योतिबा यात्रेला नेण्याची प्रथा आहे.

या १०८ काठ्यांमध्ये एक मानाची काठी आहे. ती साताऱ्यातील पाडळी गावची. या गावाला का आणि कधीपासून मान मिळाला याबद्दल माहिती घेऊयात.

राजर्षी शाहू महाराजांनी दिला मान

पाडळी हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे. तीर्थक्षेत्र पाडळी तालुका जिल्हा सातारा. पाडळी हे गाव प्रसिद्ध आहे ते इथे भरणाऱ्या ससाणकाठी जत्रेसाठी. या गावची ससाणकाठी वाडी रत्‍नागिरी येथे होणाऱ्या चैत्र यात्रे साठी जाते, त्या यात्रेमध्ये या ससाणकाठी ला पहिला क्रमांकाचा मान आहे.

यामागे अशी कथा आहे की, राजर्षी शाहू महाराजांच्या काळात प्लेगच्या साथीने हाहाकार माजवला होता. लोक घराबाहेर पडायला घाबरत होते. मग गावातून बाहेर पडण्याचा विचारही कोणी करू शकत नव्हतं. आणि अशा काळात चैत्राची पौर्णिमा तोंडावर आली होती.

त्याकाळात जत्रा पार पडणार की नाही, देवांची यात्रा यंदाच्या वर्षी होणार नाही, यंदा देवांचे दर्शन घडणार नाही, अशी भिती भाविकांच्या मनात होती. त्यावेळी प्लेगच्या रोगाला न जुमानता साताऱ्यातल्या पाडळी गावचे भाविक सासनकाठी घेऊन ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले. आणि पाडळी गावच्या ग्रामस्थांची त्याकाळात चर्चा झाली.

तेव्हा राजर्षी शाहू महाराजांनी सर्व सासनकाठ्यांमध्ये पाडळी गावाला बहुमान देऊन त्याकाळात गावकऱ्यांचा सत्कार केला.  

पाणपीठाचा उपवास

पाडळी गावातील लोक पाणपीठाचा उपवास करतात. पाण म्हणजे पाणी आणि पीठ म्हणजे ज्वारी भाजून जात्यावर दळलेले पीठ होय. तर, सासनकाठी डोंगरावर येईपर्यंत जे भाविक या काठीसोबत असतात ते केवळ पाणी व पिठ घातात. इतर काहीही ते सेवन करत नाहीत. कधी कधी अखंड तीन दिवस हे भाविक उपवास करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT