Chanakya Niti esakal
लाइफस्टाइल

Chanakya Niti : पुरुषांनो पत्नीला या गोष्टी कधीच सांगू नका, पतीने 'हे' आवर्जून वाचावे

आचार्य चाणाक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टी 21 व्या शतकातही लागू असल्याचं दिसून येतं

सकाळ ऑनलाईन टीम

Chanakya Niti : चाणाक्य नितीला आपल्या देशात विशेष महत्व आहे. काही व्यक्ती इतक्या विद्वान असतात, की त्यांचा शब्द अनेकदा प्रमाण ठरतो. त्यांना भविष्य, भूतकाळ आणि वर्तमानाविषयी असे काही संकेत मिळतात की ते बरेचदा खरेही ठरतात. आचार्य चाणाक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टी 21 व्या शतकातही लागू असल्याचं दिसून येतं.

आचार्य चाणाक्य यांनी नात्याविषयीही अशा काही गोष्टी सांगितल्या आहे ज्यामुळे नात्यात कलह होणार नाही. पती पत्नीच्या नात्यात कोणतीही गोष्ट लपवल्या जाऊ नये असे म्हटलं असलं तरी चाणाक्य नितीला मात्र ते अपवाद ठरेल. कारण चाणाक्य नितीनुसार काही गोष्टी पतीने पत्नीला न सांगणंच योग्य.

पतीने पत्नीला या गोष्टी सांगणे शक्यतो टाळाव्यात

पगाराचा खरा आकडा

चाणक्य नीतिच्या नियमांनुसार पतीनं कधीही पत्नीला त्याच्या पगाराचा खरा आकडा सांगू नये. पतीनं संपूर्ण पगार सांगितल्यास पत्नींचा अपेक्षा वाढतात. खर्चही वाढतो. हे कदाचित नात्यात अडचण येऊ शकते.

दान धर्म

तुम्ही कोणाला किती पैसे दान केलेत, किती दान केलं, कुठे किती खर्च झाला हेसुद्धा तुमच्या पत्नीला न सांगितलेलंच बरं. कारण दान करून त्याची चर्चा केल्यास त्याचं फलित तुम्हाला मिळणार नाही.

तुमची पडती बाजू

पत्नीसमोर पतीने त्याची पडती बाजू कधीच मांडू नये. अनेकदा असं होतं की पत्नीला ही माहिती मिळाल्यास तुमची प्रतिष्ठा पणाला लागू शकते. तुम्हाला चारचौघांमध्ये अपमानाचं धनी सुद्धा व्हावं लागू शकतं. (Husband-Wife)

तुमच्या फजितीविषयी सांगू नका

एकाद्या प्रसंगी तुमची कुठं फजिती झाल्यास पत्नीला याविषयी न सांगणंच उत्तम. नकळत एखाद्या प्रसंगी पत्नीसुद्धा तुमची खिल्ली उडवू शकते.

डिस्क्लेमर - हा लेख केवळ माहितीसाठी असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल - खासदार सुनील तटकरे

Satara News: हरवलेली लेक अन् काळजीत आई; शिंगणापूर पोलिसांच्या तत्परतेने पुन्हा घडली मायलेकींची भेट, काळोखात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT