Chandra Grahan 2024:  Sakal
लाइफस्टाइल

Chandra Grahan 2024: चंद्रग्रहण 17 सप्टेंबर की 18 सप्टेंबरला ? भारतात दिसणार का? योग्य वेळ कोणती? सर्व प्रश्नांची उत्तरे वाचा एका क्लिकवर

Chandra Grahan 2024: हे चंद्रग्रहणा भारतात दिसणार का आणि त्याची योग्य वेळ कोणती याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. चंद्रग्रहणात कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Chandra Grahan 2024: या वर्षातील हे दुसरे चंद्रग्रहण असून पितृ पक्षात होणार आहे. हे चंद्रग्रहण मीन राशीत होणार आहे. हे चंद्रग्रहणा भारतात दिसणार का आणि त्याची योग्य वेळ कोणती याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. चंद्रग्रहणात कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

पितृ पक्षात लागणारे हे चंद्रग्रहण बुधवारी, १८ सप्टेंबर रोजी अधिकृतपणे होईल. हे ग्रहण इतर अनेक देशांमध्ये दिसणार आहे. वास्तविक, परदेशी वेळेनुसार हे ग्रहण १७ सप्टेंबरच्या रात्री दिसेल. मात्र, भारतीय वेळेनुसार 18 सप्टेंबर रोजी सकाळी होईल.

चंद्रग्रहण कधी आणि किती वेळ असणार?

18 सप्टेंबर रोजी होणारे हे चंद्रग्रहण सकाळी 6:12 वाजता सुरू होईल. चंद्रग्रहण रात्री 10:17 वाजता संपेल. चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी सुमारे 5 तास 04 मिनिटे असेल.

भारतात दिसणार का चंद्रग्रहण?

पितृ पक्षात येणारे हे उपांत्य चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. हे खंडग्रास चंद्रग्रहण युरोप, आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका आणि आशियाच्या काही भागांसह जगभरातील 5 खंडांमध्ये दिसणार आहे.

सुतक नियम पाळावे की नाही?

हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. यामुळे कोणतेही सुतक पाळण्याची गरज नाही. . हे ग्रहण भारतात दिसले असते तर सुतक काळातील नियम पाळले गेले असते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Recruitment : पोलिस भरतीत ‘शॉर्टकट’चा स्फोट! शक्तीवर्धक पेय घेताच उमेदवाराचा मैदानावर धिंगाणा, थरारक क्षणांनी सर्वच शॉक

Latest Marathi News Live Update : बिबट्याची भीती, उन्हाचा तडाखा अन् गारपिटीचा फटका; मेंढपाळ अडचणीत

IPL 2026: ऋतुराज गायकवाडला संजू सॅमसनमुळे CSK संघात जाणवतोय धोका? माजी कर्णधाराचा खळबजनक दावा

Gemma 4 : इंटरनेटची गरज संपली! गुगलने लॉन्च केले Gemma 4; आता डेटा संपला तरी मोबाईल चालेल सुपरफास्ट, कसं वापरायचं पाहा

Gold Rate: सोनं 30 हजारांनी स्वस्त! चांदीही 1.6 लाखांनी घसरली; आता भाव वाढणार की अजून पडणार?

SCROLL FOR NEXT