CIBIL SCORE
CIBIL SCORE esakal
लाइफस्टाइल

मुलींनो, लग्नापूर्वी जोडीदाराची ही गोष्ट नक्की तपासा; नाहीतर होईल पश्चाताप

सकाळ डिजिटल टीम

बहुतेक लोक लग्नापूर्वी (Marriage) त्यांच्या जोडीदाराची आर्थिक शिस्त (Financial Discipline) पाहण्याचा प्रयत्न करत नाहीत. या कारणामुळं खराब क्रेडिट म्हणजेच सिबिल स्कोअरच्या (Cibil Score) आधारे विवाह तुटत आहेत. लग्न ही आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे लग्न करताना आपला होणारा जोडीदार (Partner) कसा असावा याबाबत अलीकडच्या काळातील मुलींमध्ये जागरुकता वाढली आहे.

जोडीदार काय करतो, त्याला आवडी निवडी काय, तो दिसतो कसा, बोलतो कसा, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे एवढंच काय तर त्याची कौटुंबिक तसेच सामाजिक पार्श्वभूमीही पाहिली जाते. याशिवाय शास्त्रामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का, हेही पाहिले जाते. परंतु हे सगळं करूनही अनेक मुलींची लग्न मोडतात. याला कारण म्हणजे मुलाची 'आर्थिक शिस्त'. (Check Cibil Score of Partener before Marriage)

मुलींना नेहमी त्यांचा जोडीदार हा देखणा, आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेला असावा असे वाटतं परंतु मुलांच्या आर्थिक नियोजनाकडं मुलींचे दुर्लक्ष असते. खराब सिबिल स्कोअरमुळे विदेशातील अनेक विवाह तुटत आहेत.

CIBIL SCORE:

तुमचे आर्थिक व्यवहार कसे आहेत, यावरून तुमचा CIBIL SCORE ठरतो. तुमचे बँकेतील व्यवहार कसे आहेत, तुम्ही घेतलेलं कर्ज वेळेत भरता का, तुम्ही दिवाळखोर आहात का इ. गोष्टींचा परिणाम CIBIL SCORE वर होतो. तुमचा सिबिल स्कोअर चांगला असल्यास तुम्हाला कर्ज मिळायला सोपं जातं परंतु तुमचा सिबिल स्कोर जर चांगला नसेल तर कोणत्याही प्रकारचं कर्ज घेण्यात अडचणी येऊ शकतात. अशा व्यक्तींशी तुमचं लग्न झालं तर भविष्यात तुम्हाला घर किंवा कार अथवा इतर गोष्टींसाठी कर्ज घ्यायची गरज असल्यास तुम्हाला कर्ज (Loan) मिळण्यात लग्न करण्यापूर्वी एकमेकांच्या सवयी जाणून घेणं गरजेचं आहे.

आर्थिक बाबींची माहिती आवश्यक-

खासकरून आर्थिक गोष्टी जाणून घेणे गरजेचं आहे. तुम्हाला जर तुमच्या सवयी माहिती असतील तर त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. एकमेकांच्या खर्च करण्याच्या सवयी आणि कर्ज घेण्याची आणि ती फेडण्याची क्षमता इत्यादीची माहिती जाणून घेणं आवश्यक आहे. तुम्ही तुमची क्रेडिट हिस्ट्री नियमितपणे तपासली पाहिजे. यामुळे तुम्हाला आर्थिक आघाडीवर आपण कुठे कमी पडत आहोत, हे जाणून घेण्यास मदत होईल आणि भविष्यासाठी एकत्रितपणे योजना बनविण्यात मदत होईल.अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुमची अनेक स्वप्न अपूर्ण राहू शकतात.

आर्थिक नियोजनाची माहिती जरुर घ्या-

तुमच्या होणाऱ्या पतीला इतर प्रश्नांसोबत त्याच्या आर्थिक नियोजनासंबंधी जरुर विचारायला हवं. तो आर्थिकदृष्ट्या स्थिर आहे का, याचा विचार नक्की करावा. तो कर्जबाजारी तर नाही ना याचा ही विचार करायला हवा. या सर्व गोष्टींत तो व्यवस्थित असेल तर तुम्ही त्याचा विचार नक्की करू शकता.

CIBIL स्कोर म्हणजे काय?

CIBIL स्कोअर तुमच्या क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट (CIR) च्या आधारे निर्धारित केला जातो. तुम्ही आतापर्यंत घेतलेल्या कर्ज आणि क्रेडिट कार्डची संपूर्ण माहिती त्यावर असते. तुमच्या कर्जाचा EMI, क्रेडिट कार्डचा वापर आणि त्यांची बिले कशी भरता या आधारावर सिबिव स्कोअर तयार केला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT