लाइफस्टाइल

चालत्या गाडीतून बाळ पडलं खाली, व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

शर्वरी जोशी

दररोज आपल्या कानावर अपघाताच्या अनेक घटना येत असतात. यातील काही घटना अगदी मन हेलावून टाकणाऱ्या असतात. असाच एक प्रकार नुकताच घडला आहे.  चालत्या कारमधून एक बाळ चक्क रस्त्यावर पडल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका चालत्या कारमधून एक लहान बाळ अचानक भररस्त्यात खाली पडलं. विशेष म्हणजे या रस्त्यावर अनेक गाड्या भरधाव वेगात जात होत्या. परंतु,  या चिमुकलीला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. हा व्हिडीओ 'द सनने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रस्त्यावर गाड्यांची वर्दळ असतांना एक एसयुव्ही कारमधून एक लहान मुलगी रस्त्यावर पडली. या चिमुकलीला पडल्यावर पाहिल्यानंतर रस्त्यावरील सगळ्याच गाड्यांनी त्यांचे ब्रेक लावले व गाड्या जागच्या जागी थांबवल्या. विशेष म्हणजे गाड्यांचा एवढा आवाज ऐकल्यानंतरही ही चिमुकली जरादेखील घाबरली नाही. रस्त्यातून उठून ती थेट तिच्या गाडीकडे धावत गेली. तर, गाडीतून चिमुकली पडल्यानंतर तिच्या कुटुंबियांनीदेखील लगेच तिच्याकडे धाव घेतली.

दरम्यान, आतापर्यंत हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून १४.४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तर, २०० च्या आसपास तो रिट्विट करण्यात आला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरणात 98.35 टीएमसी पाणीसाठा; 2 ते 3 दिवसांत धरण 100 टीएमसी भरण्याची शक्यता, धरणाचे दरवाजे 1 फुटावर...

Pune Kondhwa Ganja Raid : कोंढव्यात गांजा विक्रीवर पोलिसांचा मोठा छापा; २ विक्रेत्यांसह ४३ ग्राहक ताब्यात, २.५ किलो गांजा जप्त

Vehicle Maintenance: गाडीचं इंजिन ऑइल खराब झालंय? ९०% लोक करतात 'ही' चूक! 'या' ५ कारणांमुळे खराब होते इंजिन...

Latest Marathi News Live Update : वाकडमध्ये स्कूल व्हॅनला भीषण आग

मी पाहिलं माझ्या डोळ्यांच्या थ्रू...! मुंबई पोलिसांची Gen Z स्टाईल; नाना पाटेकर यांच्या 'क्रांतिवीर' गाण्याच्या ओळीतून केलं आवाहन

SCROLL FOR NEXT