Chinese man has been living at the airport for 14 years For smoking and drinking  
लाइफस्टाइल

बायकोशी भांडण झाल्यावर सोडलं घर; १४ वर्षांपासून तो राहतोय विमानतळावर

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्हाला कधी एअरपोर्टवर फ्लाईटची वाट पाहायची वेळ आली असेल तर तुम्हाला नक्कीच माहित असेल की हा अनुभव कसा असतो. विमानतळावर तुम्हाला सर्व प्रकारचे लोक पाहायला मिळतात. काही प्रवासी आपल्या पहिल्या विमान प्रवासासाठी खूप उत्साही असतात तर काही मस्तपणे खाऊन-पिऊन शॉपिंग करताना दिसतात. पण काही प्रवाशांना लवकरात लवकर आपल्या फ्लाईटमध्ये बसायचे असते. पण तुम्ही कधी अशी व्यक्तीबाबत ऐकले नसेल की जी विमानतळावर राहते.

Chinese man has been living at the airport for 14 years For smoking and drinking

बायकोसोबत झाले भांडण

एका चायनिज व्यक्तीला ज्याला कुटुंबापासून दूर राहायचे होते, त्यासाठी तो मागील १४ वर्षांपासून बिजिंग इंटरनॅशनल एअरपोर्टवर राहत होता. या व्यक्तीचे नाव Wei Jianguo आहे. तो बीजिंगमधील रहिवासी आणि २००८ मध्ये आपल्या बायकोसोबत भांडण करून त्याने घर सोडले होते. तेव्हापासून बीजिंग कॅपिटल इंटरनॅशनल एअरपोर्टत्याचे घर आहे. या एअरपोर्टवल ३ टर्मिनल आहे आणि तो टर्मिनल २ वर राहतो पण, सुरूवात काही दिवस रेल्वे स्टेशनवर देखील झोपला होता.

म्हणून त्याला घरी परत जायचे नाही

या बेरोजगार व्यक्तीला एअरपोर्टवर राहायला खूप आवडते. तो सांगतो की, येथे तो स्वत:च्या मर्जीने खाऊ किंवा पिऊ शकतो. त्यांनी चायना डेलीसोबत बोलताना सांगितले की, मी घरी परत जाणार नाही कारण तिथे मला कोणतेही स्वातंत्र्य नाही. माझ्या कुटुंबाने मला सांगितले की, मला घरात राहायचे असेल तर मला सिगारेट आणि दारू पिणे सोडावे लागेल जर मी असे केले नाही तर मला दर महिन्याला मिळणारे १ हजार युआन(साधारण १२ हजार रुपये) सरकारी त्यांना दयावा लागेल, मग मी स्वत:साठी सिगारेट आणि दारू कसे खरेदी करू शकेल?

हा व्यक्तीचे घर एअरपोर्टपासून साधारण १९ किमी दूर आहे.

एअरपोर्टवर बनवले छोटे किचन

घरातून आणलेल्या इलेक्ट्रिक कुकरच्या मदतीने त्या व्यक्तीने आपले छोटेसे स्वयंपाकघरही तयार केले आहे. त्याच्या आवडीचे खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी तो विमानतळावर फिरत असे. त्याने सांगितले की, त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते आणि दर महिन्याला सरकारी मिळत होती जी साधारण1,000 युआनचे एवढी होती.

वेई जिआंगुओ विमानतळावर राहणारा एकटा नाही. इराणमधील Mehran Karimi Nasseri हे रिफ्यूजी होते, जे aris Charles de Gaulle टर्मिनलमध्ये 18 वर्षे राहत होते.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT