Christmas Fashion  esakal
लाइफस्टाइल

Christmas Fashion : या फॅशनेबल ड्रेसेसने करा क्रिएट आपला ख्रिसमस पार्टी लुक

ख्रिसमस म्हटल की आपण आपल्या कपाटातल्या लाल किंवा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसच्या शोधात असतो

सकाळ डिजिटल टीम

Christmas Fashion : ख्रिसमस जवळ आला आहे, आता सगळीकडे सीक्रेट सॅंटा, ख्रिसमस पार्टी यांचे प्लॅनिंग सुरू आहे, तुम्हालाही प्रश्न पडला असेलच की आता नक्की कोणता ड्रेस घालावा? कशी स्टाईल करावी? यावर्षी ख्रिसमस रविवारी आल्याने सगळ्यांना सुट्टी आहे. ऑफिसला जाण्याचा त्रासही नाही, त्यामुळे तुम्ही छान स्टाईल करू शकतात.

ख्रिसमस म्हटल की आपण आपल्या कपाटातल्या लाल किंवा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसच्या शोधात असतो. पण नक्की काय ड्रेसिंग करावी हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. त्यात नवीन काहीतरी घेण्याचं प्लॅनिंग करत असाल तर तुम्ही या स्टाईलचे रेफरन्स घेऊ शकतात.अशात तुम्ही तुमच्या पार्टी प्लॅनिंगनुसार आपली क्लॉथिंग स्टाईल ठरवू शकतात. छान तयार होऊन चर्चमध्ये जाऊ शकतात किंवा लेट नाईट डिनरचा सुद्धा प्लॅन करू शकतात.

1. फूल स्लीव्ह टॉप आणि स्कर्ट

स्कर्ट खूप कंर्फटेबल असतो. आपण स्कर्टमध्ये डान्स करू शकतो, बाइकवर आरामात बसू शकतो, त्याला जास्त कॅरी सुद्धा करावं लागत नाही. अशात तुम्ही रेड कलरचा स्कर्ट आणि वरती फूल स्लीव्ह टॉप घालू शकतात. यावरती मोत्याचे कानातले छान दिसतील.

2. रेड ओव्हर कोट

ऑफिस पार्टी असेल किंवा जरा कॉर्पोरेट लुक करायचा असेल तर तुम्ही तुमच्या रेग्युलर ड्रेसवरती लाल रंगाचा ओव्हर कोट किंवा ब्लेजर घालू शकतात.

3. प्लेन व्हाइट वन पीस

वन पीस हा कधीही सुंदर, अशात तुम्ही पांढऱ्या रंगाचा आणि बारीक नक्षी केलेला ड्रेस घालू शकतात. हवं असेल तर तुम्ही यावरती रेड कलरचा स्कार्फ घेऊ शकतात. एका डिसेंट लुक साठी हा ड्रेस परफेक्ट आहे.

4. डिझायनर साडी

तेच तेच वेस्टर्न लुक स्टाईल करून कंटाळा आला आहे? मग यावेळेस डिझायनर साडी ट्राय करा. छान नेटची किंवा शिफॉनची साडी नेसू शकतात. याने तुमचा लुक एकदम हटके आणि खूप कॅची दिसेल.

5. ख्रिसमस ट्री थीम ड्रेस

हा खूप सुंदर ड्रेस आहे. ख्रिसमसला तसंही पांढऱ्या किंवा लाल रंगाचे ड्रेसेस लोकं घालतात. पण तुम्ही ख्रिसमस ट्रीची थीम करत एक हटके लुक ट्राय करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT