Cotton Ear Buds
Cotton Ear Buds sakal
लाइफस्टाइल

Cotton Ear Buds: कान साफ करण्यासाठी कॉटन बड्स वापरता? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत...

Aishwarya Musale

कानात पाणी, हवा, धूळ किंवा माती यामुळे घाण जमा होऊ लागते. कानात साचलेल्या मळाला इअरवॅक्स म्हणतात. बरेच लोक अजूनही माचिसच्या काड्या वापरतात. पण काही लोक कॉटन इअर बड्स वापरतात. कॉटन इअर बड्स सुरक्षित आहेत, ते करायला हरकत नाही, असे घरात सांगितले जाते.

परंतु आज आम्ही तुम्हाला सांगतो की कॉट्न बड्स कानांसाठी खरंच सुरक्षित आहेत का. याच्या वापराने खरंच कान स्वच्छ होतात का? विशेषत: शहरात लोक कॉटन बड्स वापरतात. जाणून घेऊया यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल...

कॉट्न बड्समुळे होते हे नुकसान

डॉक्टरांच्या मते कॉटन बड्सने कान स्वच्छ करणे योग्य नाही. कॉट्न बड्स कानाच्या आत टाकल्यावर ते मळ बाहेर काढण्याऐवजी मागे ढकलतात. त्यामुळे कानात संसर्ग होण्याचा धोका वाढतो. यासोबतच कानालाही दुखापत होऊ शकते. कानाच्या पडद्यासाठीही हे बड्स उपयुक्त नसतात. त्यामुळे कान साफ करण्यासाठी हे बड्स वापरु नयेत.

कानाच्या आत जाते घाण

कानात इयरवॅक्स तयार होतो. हे एक प्रकारे कानांचे संरक्षण देखील करते. पण ते जास्त प्रमाणात बनले तर कानालाही नुकसान होते. कॉटन बड्सने लोक त्यांचे कान स्वच्छ करतात, परंतु त्यातील मळ कानाच्या आत जाते. त्यामुळे कानात बॅक्टेरिया जाण्याचा धोका असतो. हे बॅक्टेरिया इतके धोकादायक असतात की त्यामुळे कानाच्या पडद्याचेही धोकादायक नुकसान होते.

कान कसे स्वच्छ करावे

कान स्वच्छ करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आधी त्यात तेल टाकणे. बेबी तेल चांगले आहे. कानात तेल टाकल्याने जी काही घाण आहे ती बाहेर पडते, जी तुम्ही कोणत्याही कपड्याच्या मदतीने स्वच्छ करू शकता. आंघोळ करताना कान स्वच्छ करणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : ''कोण येतंय कोण नाही, याच्यावर आमचं लक्ष'' मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

T20 World Cup Retire Out : टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच असा आऊट झाला खेळाडू, जाणून घ्या काय आहे नियम?

VIDEO: "यावेळी निवडणुक कोण जिंकेल?"; रितेशचा प्रश्न, जिनिलियाच्या भन्नाट उत्तरानं वेधलं लक्ष, मजेशीर व्हिडीओ व्हायरल

Solapur Crime: खळबळजनक! सोलापुरमधील मोदी स्मशानभूमीतून १० महिन्यांच्या बाळाचा मृतदेह गायब; जादू टोण्याच्या संशय

Latest Marathi News Live Update : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची तब्येत खालावली

SCROLL FOR NEXT