Cleaning Tips: शरीराची तगमग करणारा उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला आहे. काही खाद्यपदार्थ खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये ठेवले जातात. पण फ्रिजरमध्ये अनेकवेळा खुप बर्फ जमा होतो. जे काढण्यासाठी खुप मेहनत घेतली जाते. फ्रीझरमधून बर्फ डिफ्रॉस्टचा वापर न करता पुढील सोप्या गोष्टींचा वापर करू शकता.
फ्रीजमध्ये डीफ्रॉस्ट करून सहज बर्फ कमी करता येतो. पण फ्रीजर डिफ्रॉस्ट केल्यास फ्रीजचे थंड होणेही थांबते. त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेली फळे, भाज्या आणि खाद्यपदार्थ खराब होण्याचा धोका असतो.
जर तुमच्या फ्रीजरमध्ये जास्त बर्फ जमा होत असेल तर सर्वात आधी तुम्हाला एका छोट्या प्लास्टिकच्या बादलीत गरम पाणी घ्यावे लागेल. ही बादली गरम पाण्याने भरलेली फ्रीजरमध्ये ठेवा. काही वेळात सर्व बर्फ निघून जाईल.
तुमच्या घरात छोटी बादली नसेल तर तुम्ही कॉफी मगचीही वापर करू शकता. तुम्हाला कॉफीच्या मगमध्ये गरम पाणी भरावे लागेल आणि हळूहळू फ्रीजरमध्ये ठेवावे लागेल. यामुळे फ्रीझरमधील बर्फ काही वेळातच स्वच्छ होईल.
बऱ्याच वेळा फ्रीझरमध्ये बर्फाचा डोंगर तयार होतो, जो गरम पाण्यानेही सहज निघत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही गरम पाणी टाकण्यासोबतच लाकडी चमच्याने बर्फ काढू शकता. यामुळे फ्रीझरमधील सर्व बर्फ काही वेळातच स्वच्छ होईल आणि तुम्हाला तो डीफ्रॉस्टही करावा लागणार नाही.
जर तुम्हाला गरम पाण्याचा सारखा वापर करायचा नसेल तर हेअर ड्रायर वापरू शकता. यामुळे फ्रीझरमधून बर्फ देखील कमी होईल. तुम्हाला हेअर ड्रायर सामान्य वेगाने चालवावा लागेल आणि काही वेळातच फ्रीजरमधून बर्फ निघून जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.