electrical switch cleaning Tips Esakal
लाइफस्टाइल

Switch Cleaning: घरातली स्विच आणि बटणं तेलकट आणि घाण झाली आहेत, मग अशी स्वच्छ करा बटणं

Electrical switch cleaning Tips: घराची सफाई Home Cleaning करताना आपण जळमटं काढणं, खिडक्यांच्या काचा, दारं पुसणं ही कामं तर करतो. मात्र अनेकदा घरातील स्विच बोर्डकडे आपणं दुर्लक्ष करतो. कशी करावीत ही बटणं स्वच्छ

Kirti Wadkar

घरातील साफ सफाई करताना अनेकदा काही लहान गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होत असंत. मात्र कालांतराने घरातील या लहान जागा किंवा वस्तू अचानक खूप जुन्या, मळकट आणि घाण झाल्याचं आपल्या लक्षात येतं. Cleaning Tips Marathi How to clean electric switchboards and Buttons

घराची सफाई Home Cleaning करताना आपण जळमटं काढणं, खिडक्यांच्या काचा, दारं पुसणं ही कामं तर करतो. मात्र अनेकदा घरातील स्विच बोर्डकडे आपणं दुर्लक्ष करतो. खास करून शॉक Shock लागण्याच्या भितीने अनेकजण वेळोवेळी स्विच बोर्ड आणि बटणं स्वच्छ करणं टाळतात.

मात्र, कालांतराने तुमचं घर तर चकचकीत दिसतं, मात्र स्विच बोर्डवरील बटणं, काळी, चिकट थर बसलेली अस्वच्छ दिसू लागतात. खास करून स्वयंपाक घरातील आणि स्वयंपाक घराच्या जवळपास असलेले इलेक्ट्रिक बोर्ड आणि बटणं ही जास्त तेलकट आणि मळकट होत असतात. यासाठीच स्विच बोर्ड आणि त्यावरील बटणं देखील वेळोवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे.

अर्थात स्विच बोर्ड आणि बटणांमध्ये इलेक्ट्रीक सप्लाय Electricity Supply म्हणजेच विद्युत प्रवाह सुरू असल्याने हे स्वच्छ करताना विशेष खबरदारी घेणं जास्त गरजेचं आहे. योग्य ती काळजी घेत काही सोप्या ट्रिक्सच्या मदतीने ही बटन स्वच्छ करणं शक्य आहे.

हे देखिल वाचा-

स्विच बोर्ड स्वच्छ करताना घ्यायची काळजी

घरातील स्विच बोर्ड स्वच्छ करण्यापूर्वी घरातील मेन स्विच कायम बंद करावा, जेणेकरून विद्युत प्रवाह बंद होईल. तसचं हातामध्ये रबरी हॅण्ड ग्लोव्ज आणि पायांमध्येही रबरी चप्पल घालावी.

व्हिनिगर- घरातील स्विच बोर्ड आणि बटणं स्वच्छ करण्यासाठी व्हिनिगरचा उपयोग फायदेशीर ठरू शकतो. यासाठी एका वाडण्यात पाणी घ्या. त्यात २ चमचे व्हिनिगर टाका. त्यानंतर एक सुती कापड या पाण्यात बुडवून चांगलं पिळून पाणी काढा. या कापडाने बटणं पुसा.

व्हिनिगरच्या पाण्याने स्विच बोर्ड आणि बटनं पुसल्याने त्यावरील तेलकट आणि पिवळट डाग दूर होतील. हा बटणं पुन्हा पांढरी शुभ्र दिसू लागतील.

बेकिंग सोडा- स्वच्छेतेसाठी बेकिंग सोडा एक चांगलं क्लिनिंग एजंट म्हणून काम करतं. त्यामुळे स्विच बोर्ड वरील काळपटपणा आणि घाण स्वच्छ होण्यास मदत होते.

यासाठी २ चमचे बेकिंग सोडामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाकून मिश्रण तयार करा. एका ब्रशच्या मदतीने हे मिश्रण बोर्ड आणि बटनांना लावून मिनिटभरासाठी स्क्रब करा. बटणं आणि बोर्ड नव्या प्रमाणे चमकू लागेल.

नेलपेंट रिमूव्हर- नेलपेंट रिमूव्हरच्या मदतीने देखील तुम्ही बोर्ड स्वच्छ करू शकता. यासाठी एका कॉटन किंवा स्पंजच्या मदतीने यावर थोडं रिमूव्हर घ्या आणि बटणं तसचं स्विच बोर्ड चांगल रब करून पुसा. यानंतर एखाद्या कोरड्या कापडाने पुन्हा स्विच बोर्ड पुसा.

हे देखिल वाचा-

कपड्यांचं व्हाईटनर किंवा आला- पांढरे शुभ्र कपडे धुण्यासाठी अनेक जण व्हाइटनर किंवा आलाचा वापर करतात. यामुळे कपडे ज्याप्रमाणे शुभ्र होतात त्याचप्रमाण तुमच्या घरातील स्विच बोर्ड देखील स्वच्छ होतील.

यासाठी एका वाटीत पाणी घ्या आणि त्यात १ चमचा आला टाका. आता एका कापडाचा बोळा यात ओला करून जादा पाणी पिळून टाका. या कापडाने स्विच बोर्ड आणि बटणं पुसल्यास त्यावरील डाग आणि घाण दूर होईल आणि बोर्ड पुन्हा नवं दिसू लागेल.

अशा प्रकारे तुम्ही घरातील स्विच बोर्ड आणि बटणं स्वच्छ करू शकता. स्विच बोर्ड स्वच्छ केल्यानंतर लगेच मेन बोर्डातून स्विच ऑन करू नये. सर्व बटनं आणि बोर्ड कोरड्या कापडाने पुसून कोरडे करावे. तसचं अर्धा तास थांबून मगच मेन स्विच सुरू करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Morcha: आंदोलन मनसेचं आणि शिंदेंची फडणवीसांवर कुरघोडी? मीरा भाईंदर मोर्चामागचं राजकारण

MNS Mira Bhayndar Morcha: प्रताप सरनाईकांना पाहून मनसैनिकांच्या 50 खोकेच्या घोषणा, मीरा भायंदर मोर्चामधून हाकलले

Jammu Kashmir Schools: उन्हामुळे काश्‍मीरमधील शाळांच्या वेळात बदल

Kolhapur Accident : साहिलवर होती कुटुंबाची जबाबदारी, कुरिअर सेवेनंतर विकायचा बिर्याणी; पार्सल देऊन लवकर येतो म्हणून गेला अन्...

Education News : राज्यभर ८-९ जुलैला शाळा बंद; शिक्षकांचे तीव्र आंदोलन सुरू

SCROLL FOR NEXT