Pune Municipal Corporation Sakal
लाइफस्टाइल

सक्षमीकरणाला हातभार

स्वत:च्या पायावर महिलांनी खंबीरपणे उभे राहावे, या उद्देशाने स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत विविध योजना राबविण्यात येत असतात.

सकाळ वृत्तसेवा

स्वत:च्या पायावर महिलांनी खंबीरपणे उभे राहावे, या उद्देशाने स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत विविध योजना राबविण्यात येत असतात. त्याअंतर्गत पुणे महानगरपालिकेने देखील महिलांना सक्षम आणि सबल बनविण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण, स्वयंरोजगार, उद्योजकता विकास अशा विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. आपण यावेळी महापालिकेच्या विविध योजनांचा आढावा घेणार आहोत.

महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण

पुणे महानगरपालिकेतर्फे १५ ते ४५ वयोगटातील मुली आणि महिलांसाठी विविध व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. संबंधित प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या महिलांना प्रशिक्षण कालावधीत टूल किट आणि जाण्या-येण्याच्या खर्चासाठी मासिक बस पास खर्च दिला जातो. यासाठी पाचशे रुपयांची अनामत रक्कम भरावी लागते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर अनामत रक्कम परत केली जाते.

महिलांसाठी स्वयंरोजगार योजना

या अंतर्गत पुणे महानगरपालिकेतर्फे १८ ते ४५ वयोगटातील महिलांना स्वयंरोजगारासाठी म्हणजेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.

महिला सबलीकरण केंद्राची उभारणी

कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र, महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन, समुपदेशन (विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, निराधार इ.), महिलाविषयक काम करणाऱ्या संस्थांची माहिती, महिला दक्षता कमिटी संदर्भात माहिती, शिवाजीनगर न्यायालय वैकल्पिक वाद निवारण केंद्रांची माहिती, दबावगट निर्मितीसाठी मार्गदर्शन, स्वसंरक्षण प्रशिक्षण, समाज विकास विभागाच्या महिलांसाठीच्या सर्व योजना, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या महिलांसाठीच्या सर्व योजना, महिलांचे संघटीकरण, समाजातील लोकांची मानसिकता बदलणे, आर्थिक सक्षमीकरण, स्त्री अस्तित्वाची ओळख, महिलांमधील निर्णय क्षमता, उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचे मार्गदर्शन, महिलांनी स्वतः घ्यावयाची काळजी, शासनाच्या सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या पातळीवर १५ महिला सबलीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.

या केंद्राद्वारे महिलांना विविध योजनांची माहिती मिळतेच, त्याचबरोबर महिलांसाठी असणाऱ्या विविध प्रकारच्या सुविधांची माहिती आणि त्यासह आवश्यक मार्गदर्शन करण्यात येते.

उद्योजकता विकास शिबिर

महापालिकेतर्फे १८ ते ४५ वयोगटातील महिलांना विविध रोजगारांच्या आणि प्रशिक्षणाच्या उपलब्ध संधींची माहिती देण्यासाठी उद्योजकता विकास शिबिराचे आयोजन करण्यात येते.

(शब्दांकन : मीनाक्षी गुरव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Beed Baby News: मृत घोषित केलेलं बाळ रात्रभर दुर्लक्षित; दुसऱ्या दिवशी बॅगमध्ये टाकून नेलं, कुदळ सापडेना म्हणून झाला उशीर अन्...

तेजश्री प्रधानच्या झी मराठीवर दिसण्यावर स्टार प्रवाहच्या सतीश राजवाडेंची थेट प्रतिक्रिया; म्हणाले, 'ती नायिका आधी...

IND vs ENG 3rd Test: जो रूटचे विक्रमी शतक! भारतासमोर मजबूत भिंतीसारखा राहिलाय उभा; राहुल द्रविड, स्टीव्ह स्मिथचा विक्रम मोडला

SCROLL FOR NEXT