Cooking Tips
Cooking Tips esakal
लाइफस्टाइल

Cooking Tips : फोडणीत कांदा-टोमॅटो करपला? 'या' टिप्सनं चव ठेवा कायम

सकाळ डिजिटल टीम

Ways To Remove Burnt Taste From Foods : अनेक वेळा स्वयंपाक करताना थोड्याशा निष्काळजीपणामुळे भाजीसाठी तयार केलेले मसाले भांड्याच्या तळाला चिकटून जळून जातात. त्यामुळे जेवणाची चव आणि तुमची मेहनत दोन्ही खराब होतात.

जर तुमच्यासोबत असे कधी घडले तर या ४ सोप्या कुकिंग टिप्सचा अवलंब करून तुम्ही तुमची मेहनत आणि भाज्यांची चव दोन्ही वाचवू शकता. चला जाणून घेऊया या किचन टिप्सबद्दल.

कढई खरवडू नका

स्वंयपाक करताना भाजीचा मसाला शिजवताना भांड्याच्या तळाशी लागला तर ते खरवडू नका. बर्‍याचदा लोक मसाले जळू लागले की ही चूक करु लागतात. ज्यामुळे त्यांच्या जेवणाची चव खराब होते. भाजीत मिसळलेला जळलेला मसाला त्याची चव खराब करतो. जळालेला भाग खरवडून न काढता तो दुसऱ्या भांड्यात काढा.

बटाट्याचा वापर

मसाला भाजताना तो जळू लागला तर कच्चा बटाटा सोलून त्या मसाल्यात मिक्स करा. थोडा वेळ मंद आचेवर शिजवा. १० मिनिटांनी बटाटे बाहेर काढा. बटाटा कडू आणि जळलेली चव स्वतःमध्ये शोषून घेतो.

दूध आणि दह्याचा वापर

भाजी किंवा ग्रेव्हीचा मसाला जळत असेल तर ताबडतोब भांड्यात दोन चमचे दही, दूध किंवा मलई मिक्स करा आणि न ढवळता दोन ते तीन मिनिटे शिजवा. नंतर हळूहळू रस्सा हलवा. त्यामुळे जळलेल्या मसाल्यांचा वास आणि चव जेवणात येत नाही.

तूप

भाजीचा मसाला किंवा वरणाचा तडका किंचित भाजला असेल तर त्यात दोन चमचे देशी तूप घाला. देशी तुपाचा वास जळलेल्या अन्नाचा वास लपवतो आणि जेवणाची चवही वाढवतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT