hot water
hot water 
लाइफस्टाइल

कोरोना काळात गरम पाणी पिताय? मग हे नक्की वाचा

शर्वरी जोशी

गेल्या वर्षभरापासून प्रत्येक जण कोरोना विषाणूचा सामना करत आहे. अद्याप या विषाणूवर कोणतंही ठोस औषध उपलब्ध झालेलं नाही. त्यातच या विषाणूची दुसरी लाटदेखील येऊन ठेपली आहे. म्हणूनच, या काळात प्रत्येकाने स्वत:ची जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. डॉक्टर व आरोग्य यंत्रणेकडूनही नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यामुळे गरम पाणी पिणे, गरम पाण्याची वाफ घेणे, काढा घेणे असे अनेक घरगुती उपाय सध्या प्रत्येक घराघरात सुरु आहेत. विशेष म्हणजे आता प्रत्येक घरात दररोज गरम पाणीच प्यायलं जात आहे. म्हणूनच कोरोना काळात गरम पाणी पिण्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात. (covid19 tips 4 reasons to drink hot water amidst the ongoing global pandemic)

१. सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होतो -

अनेकदा सर्दी किंवा खोकल्या झाल्यावर छातीत कफ जमा होतो. त्यामुळे गरम पाणी प्यायल्यामुळे हा कफ पातळ होण्यास मदत होते. परिणामी, नाक सतत बंद होणे, वास घेण्यास त्रास होणे या समस्यांपासून सुटका मिळते.

२. शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते -

उघड्यावरील किंवा बाहेरील पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात नकळतपणे अनेक विषारी घटक प्रवेश करत असतात. त्याचा परिणाम कमी-अधिक प्रमाणात आपल्या आरोग्यावर होत असतो. हे विषारी घटक शरीराबाहेर टाकण्यासाठी गरम पाणी ही योग्य उपचार पद्धती आहे. गरम पाण्यामुळे शरीर डिटॉक्स होतं. ज्यामुळे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकले जातात.

३. पचनक्रिया सुधारते -

निरोगी आरोग्य हवं असेल तर आपली पचनयंत्रणा सुरळीत असणं अत्यंत गरजेचं आहे. जर पचनयंत्रणेत बिघाड झाला तर बद्धकोष्ठता, आम्लपित्त, अॅसिडीटी अशा समस्या निर्माण होतात. म्हणूनच जेवण झाल्यावर दररोज गरम पाणी प्यावं. गरम पाणी प्यायल्यामुळे अन्नपचन सुरळीत होते, ज्यामुळे पोटाशीनिगडीत किंवा पचनयंत्राशी संबंधित कोणत्याही तक्रारी जाणवत नाही.

४. रक्ताभिसरण सुरळीत होते -

गरम पाणी प्यायल्यामुळे शरीरात रक्ताभिसरण सुरळीतरित्या होते. त्यामुळेच शरीरातील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT