Health esakal
लाइफस्टाइल

Health: स्टाईलच्या नादात जीव गमावून बसाल! कुरळ्या केसांना स्ट्रेट करणं पडू शकतं महागात

तुम्हीही जर का तुमचे कुरळे केस स्ट्रेट करण्याच्या विचारात असाल तर तुमच्या आरोग्याचा दोनदा विचार करा

सकाळ डिजिटल टीम

Hair Care: तुमचे केस कुरळे आहेत म्हणून तुम्हाला आवडत नाहीत काय? आणि कुरळ्या केसांना कंटाळून तुम्हाला सतत त्यांना स्ट्रेट करण्याची इच्छा होते. मात्र ते तुमच्या आरोग्यासाठी किती गंभीर ठरू शकतं याची कल्पना तुम्हाला आहे काय. नुकत्याच झालेल्या संशोधनात केस सरळ करणे म्हणजेच आजच्या स्टाईलनुसार हेअर स्ट्रेटनिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकलमुळे कँसरचा धोका वाढतो. संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तुम्हीही जर का तुमचे कुरळे केस स्ट्रेट करण्याच्या विचारात असाल तर तुमच्या आरोग्याचा दोनदा विचार करा.

अमेरिकमध्ये दुर्मिळ आणि धोकादायक गर्भाशयाच्या कँसरची प्रकरणं वाढताना दिसताय. १५ वर्षाआधी हा आकडा ३९ हजार केसेसमध्ये होता. मात्र आता हा आकडा वाढून ६६ हजारांवर गेलाय. जर्नल ऑफ नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, ज्या महिला नियमितपणे केमिकल हेअर स्ट्रेटनर वापरतात त्यांना या कँन्सर सारख्या गंभीर आजाराचा धोका वाढतो.

संशोधकाच्या मते, ज्या लोकांनी केस स्ट्रेटनिंग कधीच केले नाही त्यात वयाच्या ७० व्या वर्षी गर्भाशयाच्या कँसर होण्याचा धोका १.६४ टक्के होता. तर ज्या मुली हेअर स्ट्रेटनिंग करत असतात त्यांच्यात हे प्रमाण ४.०५ टक्के दिसून आलं. त्यामुळे कर्ली म्हणजेच कुरळे केस असलेल्या मुलींनी हेअर स्ट्रेटनिंग शक्यतोवर टाळावी.

हेअर स्ट्रेटनिंगमध्ये या केमिकल्सचा समावेश असतो

शास्त्रज्ञांकडून झालेल्या अभ्यासात एकंदरीत असे दिसून आले आहे की हे स्ट्रेटनर स्त्रियांमध्ये हार्मोनशी संबंधित कॅन्सरचा धोका वाढवू शकतात. संशोधनानुसार पॅराबेन्स, बीपीए (बिस्फेनॉल-ए), धातू, फॉर्मल्डिहाइड यासारख्या स्ट्रेटनरमध्ये आढळणारी अनेक केमिकल्स गर्भाशयाच्या कॅन्सर होण्यास जबाबदार ठरू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tourist Rescue Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये थरार! हवेत लटकलेल्या केबिनमध्ये 400 अडकले पर्यटक, केबल कार बिघाडानंतर रात्रभर बचावकार्य

Latest Marathi News Live Update : डिझेल जातेय कुठे? प्रत्येक पंपावर तलाठ्यांचा ‘वॉच’ ठेवण्याची तयारी

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यासंदर्भात पुरवठा विभागाचे महत्त्वाचे आदेश

Pune District: डिझेलच्या तुटवड्याने शेतकरी हैराण; बहुतांश पंपांवर वाहनांच्या रांगा; मर्यादित प्रमाणात वाटप

Chhatrapati Sambhajinagar: शिंदे सेनेच्या नेत्यावर हल्ला; हिंमत असेल तर भेटायला ये म्हणाला, भेटताच मजाक केला म्हणत गळाभेट घेऊन चाकूने भोसकलं

SCROLL FOR NEXT