लाइफस्टाइल

खाण्यासह फिरण्याच्या गोष्टी; प्रवास कर्ली टेल्सचा

सूरज यादव

खाण्यावर, प्रवासावर असलेलं प्रेम आणि यातून सुरु झालेल्या प्रवासात आता आणखी २५ ते ३० जण आले आहेत. आमची भन्नाट अशी टीम आता यासाठी काम करते असं कामिया यांनी सांगितलं.

सोशल मीडियावर आजकाल अनेक प्रेरणा देणाऱ्या स्टोरीज आपल्याला दिसतात. सोशल मीडियावर सध्या कंटेंट क्रिएटर्स वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी माहिती देणं तसंच मनोरंजनाचेही काम करतात. यातून त्यांना आर्थिक उत्पन्नही मिळतं. अर्थात त्यासाठी फॉलोअर्स आणि देत असलेला कंटेंट या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. कामिया जानी यासुद्धा अशाच काही कंटेंट क्रिएटर्सपैकी एक आहेत ज्यांनी कर्ली टेल्स नावाची कंपनी सुरु केली आणि त्यामाध्यमातून भारतातील विविध खाद्यसंस्कृती आणि प्रवासाची माहिती दिली. त्यांच्या या प्रवासाबद्ल आणि कर्ली टेल्स सुरु करण्याचा उद्देश, त्यासाठी सोशल मीडिया, फेसबुकची झालेली मदत कामिया जानी यांनी सांगितलं आहे. कर्ली टेल्स ही कंपनी २०१७ मध्ये कामिया जानी यांनी सुरु केली. खरंतर त्याआधी एका बिझनेस न्यूज चॅनलवर कामिया या न्यूज अँकर होत्या. दहा वर्षांचा अनुभव या क्षेत्रात घेतल्यानंतर त्यांना आपण या कामात अडकून पडलोय असं वाटयला लागलं. जग फिरण्याची आणि पाहण्याची इच्छा आपल्याला होती असं कामिया सांगतात.

कामिया यांनी सांगितलं की, न्यूज अँकरची नोकरी सोडून कर्ली टेल्स कंपनी सुरु केली तेव्हा माझी मुलगी तीन वर्षांची होती. आता नाही तर नंतर कधी असा विचार करून पाऊल टाकलं. माझी फिरण्याची आवड म्हणून हे सुरु केलं आणि सुरुवातीला फक्त अनुभव लिहित गेले. ते फेसबुकवर पोस्ट करणं इतकंच सुरु होतं. तेव्हा असा कंटेंट आवडणाऱे लोक मला फेसबुकवर भेटले.

प्रवासाचे, खाण्या पिण्याचे व्हिडिओ तयार करणारे फारसे प्लॅटफॉर्म नव्हते हे कर्ली टेल्स सुरु केल्यानंतर मला समजलं. तेव्हा व्हिडिओ करायला सुरु केले आणि ते अनेकांना आवडले. त्यानंतर माझा रंजक असा प्रवास सुरु झाला. माझं खाण्यावर, प्रवासावर असलेलं प्रेम आणि यातून सुरु झालेल्या प्रवासात आता आणखी २५ ते ३० जण आले आहेत. आमची भन्नाट अशी टीम आता यासाठी काम करते असं कामिया यांनी सांगितलं.

फूड आणि ट्रॅव्हलपासून झालेली सुरुवात ही स्ट्रिट फूड, रेस्तराँमधील पदार्थ यावर एक मिनिटाचा व्हिडिओ तयार करण्यापुरती होती. त्यानंतर आता आम्ही बऱ्याच गोष्टी करतो. सेलिब्रिटींच्या मुलाखतीसुद्धा घेतो. आतापर्यंत नवाजुद्दिन सिद्दिकी, तापसी पन्नू, श्रुती हसन, विराट कोहली आणि काजोल अशा अनेक ख्यातनाम सेलिब्रिटीजना आम्ही ब्रंचसाठी बोलावून त्यांचा आजवरचा प्रवास, फिरणं, खाद्यपदार्थ याबद्दची त्यांची आवड, अनुभव अशा गप्पाही मारल्या. आमची ही संकल्पना अनेकांना आवडली आणि यातून आम्हाला आणखी उर्जा मिळाली असं कामिया म्हणतात.

कोरोनाच्या काळात नवा दृष्टीकोन मिळाला

गेल्या दीड दोन वर्षांपासून कोरोनाचा परिणाम जगावर झाला. त्याकाळात कर्ली टेल्सने काय केलं याबाबत सांगताना कामिया म्हणतात की, या महासंकटाने या व्यवसायाकडे नव्याने पाहण्याची संधी दिली. कर्ली टेल्स ही प्रवासाशी संबंधित कंपनी आहे आणि प्रवास हा ऑनलाइन होऊ शकत नाही. आम्ही काही व्हर्च्यु्अल टूर केल्या पण त्यात मजा नाही. आपण पुन्हा काम सुरु करू याबद्दल आम्ही पॉझिटिव्ह होतो. कोरोनाने आम्हाला कंटेंट स्ट्रॅटेजीकडे नव्यानं पाहण्याची संधी दिली. आम्ही कंटेंटवर भर दिला. या काळात अनेक लोक अडकून पडले होते. अशा लोकांना नातेवाईकाची भेट घेण्यासाठी ट्रॅव्हल गाइड म्हणून फेसबुक इन्स्टंट आर्टिकलचा वापर केला. यातून प्रवास कसा करायचा याची माहिती देण्यासाठीचं एक माध्यम बनलो.

आमचा कंटेंट आता एका व्यवसायाकडे जात आहे. फक्त मार्गदर्शन आणि सुचवण्यापुरतं आम्ही मर्यादीत राहिलो नाही तर यातले काही अनुभव विकलेसुद्धा. आम्ही फाइव्ह स्टार हॉस्पिटलमध्ये खास क्युरेटेड एक्स्पिरिअन्स देऊ केला आणि फेसबुकवर याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर 500 हून अधिक लोकांनी तो विकत घेतला. थोडक्यात काय तर, जग फिरण्याच्या आवडीतून सुरू झालेला हा प्रवास कंटेंट क्रीएशन आणि त्यानंतर क्युरेशनवर पोहोचला.आता तो व्यवसाय बनला आहे जिथे फेसबुकवरून केलेल्या शिफारशींवर आधारित व्यवहार केले जातात असंही कामिया यांनी म्हटलं.

फेसबुक एक चांगला प्लॅटफॉर्म ठरलं

कर्ली टेल्सचे २.२ दशलक्षहून अधिक फॉलोअर्स आहेत. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपेक्षा फेसबुकवर जास्त फॉलोअर्स असून प्रवासाची सुरुवात याच प्लॅटफॉर्मवरून झाल्याचं कामिया सांगतात. फेसबुकने आम्हाला अधिक प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची आणि कर्ली टेल्सला वेगळी ओळख दिली. लोकांपर्यंत पोहोचवलं आणि कंटेंटमध्ये प्रयोग करण्याची संधीही दिली. विशेष म्हणजे सर्व वयोगटात पोहोचण्यासाठी फेसबुकची मदत झाली असही कामिया जानी यांनी सांगितलं.

जे करायचं त्यात सातत्य हवं

हल्ली सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. टिकटॉक बंद झाल्यानंतर इन्स्टा रीलसह अनेक शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यावर कंटेंट क्रिएट केला जातो. नव्याने अशा कंटेंट क्रिएटिंगमध्ये येणाऱ्यांना कामिया सांगतात की जे करणार आहात त्यात सातत्य ठेवा. हा खूप लांबचा प्रवास आहे. यामध्ये मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. तुम्हाला आवडत असलेला विषय निवडा आणि वर्षभर यातून काही कमवायचे नाही असे समजून काम करा. यातून फक्त पैसा कमावणं एवढंच ध्येय नका ठेवू तर तुमच्या कामावर प्रेम असायला हवं असंही त्या सांगतात.

कर्ली टेल्सला आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायचंय

कर्ली टेल्सचा आतापर्यंतचा प्रवास हा स्वप्नवत आहे. ते इतकं मोठं माध्यम होईल असा विचार कधीच केला नव्हता. आमच्यासोबत जोडल्या गेलेल्यांची संख्या आणि ज्यांच्यासोबत काम करतोय ते पाहिलं की खूप समाधान होतं आणि आनंद वाटतो. कर्ली टेल्सल आता भारतासह परदेशातही पोहोचणार आहे. दुबईत आहोतच, आता भारतातील छोट्या शहरांपर्यंत पोहोचण्याचा तसेच युरोप, लंडन, युके अशा आंतरराष्ट्रीय स्तरावर जायची तयारी करत असल्याचंही कामिया यांनी सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT