dance sakal
लाइफस्टाइल

Dancing Health Benefits: रोज 30 मिनिटं मनसोक्त नाचा आणि दुखण्याला म्हणा 'अलविदा'

तुम्हाला माहीत आहे का, की नृत्य केल्याने संपूर्ण शरीराची कसरत होते का? चला तर मग जाणून घेऊ याविषयी या '8' रंजक गोष्टी.

सकाळ डिजिटल टीम

काही लोकांना नृत्य करणे खूप आवडते. त्याचा हा छंद त्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो.

तुम्हाला माहीत आहे का की नृत्य केल्याने संपूर्ण शरीराची कसरत होते का ? चला तर मग जाणून घेऊ याविषयी या '8' रंजक गोष्टी.

1) आजच्या धकाधकीच्या जिवनात दररोज नियमितपणे व्यायाम करणे किंवा इतर शारीरिक हालचाली करणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. असे केल्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते आणि आरोग्य तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

2) तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की दररोज 30 मिनिटे नृत्य तुम्ही तुमचा फिटनेस सुधारू शकता आणि निरोगी आयुष्य जगू शकता.नृत्यामुळे संपूर्ण शरीराची कसरत होते. ज्यामुळे तुमचे शरीर मजबूत होते, कॅलरीज बर्न होतात आणि वजन कमी करणे सोपे होते. अनेक अभ्यासातून हे समोर आले आहे की नृत्य केल्याने तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकता.

3) नृत्य केल्याने शरीराला अधिक ऊर्जा मिळते.

WebMD च्या रिपोर्टनुसार, 30 मिनिटे डान्स केल्याने 130 ते 250 कॅलरीज बर्न होतात. डान्समुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि शरीर मजबूत होते. यामुळे संतुलन आणि समन्वय निर्माण होण्यास मदत होते. आपण कोणत्या प्रकारचा डान्स करत आहात यावर ते अवलंबून असले तरी.

4) काही फास्ट डान्स आहेत, तर काही स्लो डान्स नृत्य आहेत. दोन्ही प्रकारच्या डान्समध्ये तुमचे शरीर आणि मन गुंतलेले असतात. डान्स तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतो.

5) डान्स केल्याने तुमच्या शरीराचे मुख्य स्नायू हलतात आणि मजबूत होतात. डान्स दरम्यान पाय हलवणे खूप महत्वाचे आहे आणि त्याचे तुमच्या खालच्या शरीरासाठी बरेच फायदे आहेत.

6) एवढेच नाही तर तुमच्या हाताचे आणि पाठीचे स्नायूही हलतात आणि संपूर्ण शरीर तंदुरुस्त होते. डान्स तुमची ताकद वाढवते आणि लवचिकता सुधारते. विशेष म्हणजे तुम्ही घरीही डान्स करू शकता. यासाठी तुम्हाला पैसे देऊन बाहेर जाण्याची गरज नाही.

7) डान्स केल्याने तुमचा आनंद तर राहतोच पण त्याचबरोबर अनेक आजारांपासून तुमचे रक्षण होते. ज्यांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांच्यासाठी नृत्य फायदेशीर ठरू शकते.

8) हृदयविकार आणि उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनीही फिट राहण्यासाठी डान्स करावा. जर तुम्हाला डान्स करताना काही त्रास होत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Delhi Police Detention Row : "या पोलिसांच्या बसेस आहेत की छळ छावण्या?"; आंदोलक नेहा बोराचा बसमधून व्हिडिओ शेअर करत थेट सवाल!

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Electric Shock: जमिनीपासून अवघ्या ४ फुटांवर वीजवाहिनी; विजेचा धक्का लागून दोन म्हशींचा मृत्यू; प्रसंगावधान राखल्याने तीन म्हशी वाचल्या

SCROLL FOR NEXT