priyanka bhatt
priyanka bhatt google
लाइफस्टाइल

अंगणवाडी सेविकेच्या मुलीला २१ लाखांचे पॅकेज

नमिता धुरी

मुंबई : करोनामुळे विविध क्षेत्रांतील अर्थव्यवस्था ढासळल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या असताना तसेच वेतनकपात होत असताना उत्तराखंडच्या एका मुलीला मात्र एका बहुराष्ट्रीय कंपनीत २१ लाखांचे पॅकेज असलेली नोकरी मिळाली आहे.

उत्तराखंडच्या न्यू तेहरीमध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय प्रियांका भट्ट हिने आपले प्राथमिक शिक्षण वंचित कुटुंबांतील मुलांना शिक्षण देणाऱ्या Purkal Youth Development Society (PYDS) या संस्थेतून पूर्ण केले. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन या विषयात अभियांत्रिकीची पदवी घेतली. प्रियांकाचे प्रवेश प्रक्रियेतील गुण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी याचा विचार करूनच PYDS संस्थेने तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली.

या संस्थेतून शिक्षण घेणारी मुले घरकामगार, सफाई कामगार यांची असतात. प्रियांकासुद्धा अशाच पार्श्वभूमीतून आलेली आहे. तिची आई अंगणवाडी सेविका असून वडील तेहरी धरणाच्या देखभाल-दुरूस्ती विभागात काम करतात.

एका अमेरिकी कंपनीच्या हैदराबाद येथील कार्यालयात लाखो रुपयांची नोकरी प्रियांकाला मिळाल्याने तिच्या कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

"PYDSबद्दल मला माझ्या मैत्रिणीकडून कळलं. त्यामुळे तिथे अकरावी-बारावीसाठी प्रवेश घेण्याची माझी इच्छा होती. या शाळेने मला माझ्या स्वप्नांची जाणीव करून दिली आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यामुळेच मला UPESमध्ये अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळाला. शिक्षणाचा खर्च, राहण्याचा खर्च, इत्यादी सर्व PYDSने केले", असे प्रियांकाने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT