Diabetes Patient Diet esakal
लाइफस्टाइल

Diabetes Patient Diet : Diabetes असणाऱ्यांसाठी बेसन खाणे सुरक्षित आहे का?

बेसनामध्ये साखर असते का?

Pooja Karande-Kadam

Diabetes Patient  Diet : मधुमेह एक अशी समस्या आहे ज्यात रक्तामध्ये साखरेचा स्तर नियंत्रित राहत नाही. आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की अचानक कशी साखर नियंत्रित होणे बंद होते? त्या आधी कशी काय साखर नियंत्रित व्हायची? चला जाणून घेऊया या दोन्ही प्रश्नांची उत्तरे.

आपल्या शरीरात पेंक्रीयाझ नावाची एक ग्रंथी असते. यातून इन्सुलिन नावाचं हार्मोन तयार होत असतं. हेच इन्सुलिन आपली शरीरातील रक्तात तयार होणाऱ्या ग्लुकोज वा साखरेची मात्रा नियंत्रित ठेवण्याचं काम करतं. पण शारीरिक बदलासह पेंक्रीयाझ इन्सुलिन तयार करू शकत नाही आणि साखरेचा स्तर वाढत जातो. शेवटी तो मनुष्य मधुमेहाला बळी पडतो.

मधुमेहासारख्या आजारांमध्ये साखरेचे नियमन महत्त्वाचे आहे. कोणत्याही छोट्याशा चुकीमुळे तुमची साखरेची पातळी वाढू शकते. अशा परिस्थितीत आपण फळे आणि भाज्यांबद्दल बोलत राहतो, परंतु आज आपण मधुमेहावरील बेसनाबद्दल बोलणार आहोत. वास्तविक, मधुमेहामध्ये बेसनाबाबत तज्ञांची वेगवेगळी मते आहेत. अशा परिस्थितीत आम्ही लखनऊ डाएट क्लिनिकचे डाएट एक्सपर्ट अश्वनी कुमार यांनी याबाबत योग्य माहिती दिली.

बेसनामध्ये साखर असते का?

आहार तज्ञ अश्वनी म्हणतात की हरभरा दळून बनवलेले बेसन हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न आहे. हरभऱ्याचा जीआय केवळ 6 असतो, तर त्यापासून बनवलेल्या बेसनाचा जीआय 10 असतो. त्यामुळे या संदर्भात, मधुमेहामध्ये बेसन खाणे हानिकारक नाही.

मधुमेहामध्ये बेसन कधी हानिकारक ठरते?

मधुमेहामध्ये बेसनाचे स्नॅक्स खाणेही अनेक बाबतीत हानिकारक ठरू शकते. खासकरून जेव्हा तुम्ही बेसनापासून बनवलेले स्नॅक्स जसे की पकोडे आणि बेसनाचे भजिया खाता तेव्हा. या सर्वांचा GI इंडेक्स लगेच वाढतो आणि तो 28-35 असतो, त्यामुळे साखरेची पातळी लगेच वाढते. त्यामुळे असे बेसन खाणे टाळावे.

मधुमेहामध्ये बेसन कसे खावे

मधुमेहामध्ये प्रथम घरी बनवलेले बेसन खावे.

भाजलेले हरभरे घेऊन ते पूर्णपणे बारीक न करता जरा खडबडीत ठेवा.

याशिवाय बेसनाचा स्नॅक्स खाण्याऐवजी बेसनाची रोटी खाऊ शकता, जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी अधिक फायदेशीर आहे.

त्यामुळे जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर बेसनाच्या भजीऐवजी बेसनाची पोळी खावी.

तुमच्या शुगर स्पाइकवर नियंत्रण ठेवण्यासोबतच ते मधुमेहाच्या इतर लक्षणांमध्येही मदत करेल, ज्यामुळे तुमची साखरेची पातळी नियंत्रणात राहील.

मधुमेह असलेल्यांनी हे खावं

मधुमेही व्यक्तींनी आहारात लसूण, आले, हळद, कांदा यांचे प्रमाण जास्त ठेवल्यास लाभदायी ठरते. ओली हळद व आले यांचे एकत्रित लोणचे नियमित आहारात ठेवल्यास फायदा होतो. भाज्यांमध्ये शेवग्याच्या शेंगा, पानाफुलांची भाजी, कारल्याची भाजी, पडवळ, करटुली, केळ्याचे नवीन ताजे फूल, घोळ यांची भाजी आहारात जास्त प्रमाणात ठेवावी.

मधुमेह कमी करणारे आणि शरीरस्थ अग्नी वाढवणारे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. सतत गरम पाणी पिण्याचा सल्ला शास्त्राने मधुमेही व्यक्तींनी दिला असून पाण्यात नागरमोथा, दारूहळद, सुंठ, त्रिफळा टाकल्यास ते अत्यंत गुणकारी ठरते.

मधुमेही व्यक्तींनी आहारात आले, लसणाचा वापर अधिक प्रमाणात केल्यास गुणकारी ठरते. ओल्या हळदीचे व आल्याचे लोणचे रुची वाढवणारे आणि त्रास कमी करणारे ठरते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT