Diet For Healthy Eyes esakal
लाइफस्टाइल

Diet For Healthy Eyes : दृष्टी सुधारण्यात गाजरापेक्षाही हे पदार्थ जास्त मदत करतील,वेळीच खायला सुरू करा

बीटा कॅरोटीन देखील असते डोळ्यांसाठी फायदेशीर

Pooja Karande-Kadam

Diet For Healthy Eyes :  लहान मुले असोत की प्रौढ व्यक्तीची दृष्टी कोणत्याही वयात खराब होऊ लागते. परंतु, काही सामान्य कारणांबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये जास्त टीव्ही पाहणे, मोबाईल किंवा कॉम्प्युटर स्क्रीनसमोर बसणे आणि आहारात पोषक तत्वांची कमतरता यांचा समावेश होतो. 

यावेळी काही खाद्यपदार्थांचे सेवन डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या पदार्थांमधून डोळ्यांना आवश्यक असलेली सर्व पोषकतत्त्वे मिळतात. हे डोळ्यांना जीवनसत्त्वे, ओमेगा -3 फॅटी ऍसिडस्, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि जस्त तसेच अँटी-ऑक्सिडंट्स प्रदान करतात. (Eye Diet In Marathi)

ब्रोकोली

व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध, ब्रोकोली व्हिटॅमिन एचा एक चांगला स्रोत आहे. हे विशेषतः वय संबंधित डोळ्यांच्या समस्या दूर करते. ब्रोकोली सॅलड, भाजी किंवा सूपमध्ये घालून खाऊ शकतो.

रताळे

शरीरासाठी निरोगी अन्नपदार्थांमध्ये रताळ्याचा उल्लेख केला जातो. रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीन देखील असते आणि हे देखील डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. रताळ्यामध्ये असलेले बीटा कॅरोटीन डोळ्यांना कमी प्रकाशाशी जुळवून घेण्यास मदत करते.

केशर

आरोग्यापेक्षा केशरचा उपयोग सौंदर्य वाढवण्यासाठी केला जातो तर केशर आरोग्य चांगले ठेवण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. केशर डोळ्यांचे रक्षण करते आणि दृष्टी सुधारण्यास देखील मदत करते. याशिवाय डोळ्यांचे आजार होण्याची शक्यताही कमी असते.

अंडी

अंड्यातील पिवळ बलक विशेषतः दृष्टी सुधारण्यासाठी प्रभावी आहे. त्यामध्ये ल्युटीनचे प्रमाण चांगले असते जे मॅक्युलर रोग कमी करते. यामुळे डोळ्यांना फायदा होतो आणि वयाबरोबर डोळे कमजोर होण्याची समस्याही कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT