Divorce Temple esakal
लाइफस्टाइल

Divorce Temple : इथे आहे घटस्फोटाचं मंदिर, १२ व्या शतकातल्या अत्याचारीत महिलांचा निवारा

काकुसन-नी नावाच्या ननने तिचा पती होजो तोकिमुने यांच्या स्मरणार्थ बांधले होते

Pooja Karande-Kadam

Divorce Temple : आजच्या आधुनिक काळातही घटस्फोट घेतलेल्या महिलेला अनेक गोष्टीचा सामना करावा लागतो. घरच्याच लोकांचे टोमणे ऐकावे लागतात. घटस्फोट घेऊन दुसऱ्या व्यक्तीचा विचार केला तरीही तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

पण अनेक शतकांपूर्वी जेव्हा सर्वकाही समाज व्यवस्थेच्या हातात होते. तेव्हा महिलांना घटस्फोटाचा विचार करणेही पाप मानले जाते. त्या काळात अत्याचार सहन करावा लागत असे. तसेच, महिलांना घटस्फोट घेण्याचीही परवानगी नव्हती. 

पण, त्या काळातही जपानमध्ये बदल होत होता. 12व्या आणि 13व्या शतकात जपानी समाजात घटस्फोट घेण्यासाठी तरतुदी होत्या. पण त्या फक्त पुरुषांपुरत्याच मर्यादित होत्या. पुरुष आपल्या बायकोला सहज घटस्फोट देऊ शकत होते. तर स्त्रिया या कौटुंबिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवू शकत नव्हत्या.

जपानी तंत्रज्ञान जितके पुढारलेले आहे तितकेच प्राचिन इथली संस्कृती आहे

साधारण,1285 च्या काळात मत्सुगाओका टोकेई-जी, ज्याला घटस्फोट मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी त्याचे दरवाजे उघडले. हे मंदिर घटस्फोट मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.

हे नाव जितकं विचित्र वाटतं तितकंच त्यामागची कल्पनाही तितकीच अनोखी आहे. मत्सुगाओका टोकेजी नावाचे हे मंदिर 600 वर्षांपूर्वी बांधले गेले. हे जपानमधील कामाकुरा शहरात आहे. जपानमधील हे मंदिर घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या अनेक महिलांचे घर आहे. अनेक शतकांपूर्वी अनेक स्त्रिया आपल्या अत्याचारी पतीपासून वाचण्यासाठी या मंदिराचा आश्रय घेत असत.

हे खास मंदिर काकुसन-नी नावाच्या ननने तिचा पती होजो तोकिमुने यांच्या स्मरणार्थ बांधले होते. येथेच त्यांनी त्या सर्व महिलांचे स्वागत केले. जे त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी नव्हते किंवा घटस्फोट घेण्याचा कोणताही मार्ग नव्हता.  

घटस्फोट मंदिराची प्राचिनता दाखवते ही मूर्ती

मंदिरात पुरुषांना प्रवेश दिला जात नव्हता

कामकुरा युगात, पतींना कोणतेही कारण न देता त्यांचे लग्न संपवण्यासाठी केवळ औपचारिक घटस्फोट पत्र, "साडेतीन ओळींची नोटीस" लिहिणे आवश्यक होते. दुसरीकडे, महिलांना असे अधिकार नव्हते.

या लग्नापासून पळ काढणे हाच पर्याय त्यांच्यासमोर होता. टोकेई-जी येथे तीन वर्षे राहिल्यानंतर त्यांना त्यांच्या पतींसोबतचे वैवाहिक संबंध तोडण्याची परवानगी मिळाली. नंतर हा कालावधी केवळ दोन वर्षांवर आणण्यात आला.

या मंदिराला "अलगावचे मंदिर" असेही म्हटले जात असे. 1902 पर्यंत या 600 वर्ष जुन्या मंदिरात पुरुषांना प्रवेश करण्यास मनाई होती. त्यानंतर 1902 मध्ये जेव्हा एंगाकू-जी यांनी या मंदिराची देखरेखीची जबाबदारी घेतली तेव्हा त्यांनी प्रथमच एक पुरुष मठाधिपती नियुक्त केला.

नैसर्गिक सौदर्यांने नेटलेला आहे मंदिर परिसर

मंदिराभोवती होते निसर्गसौंदर्याची उधळण

हे बौद्ध मंदिर पाच झेन नन्सच्या समुदायाचा भाग आहे.  ज्यांना अमागोझन म्हणून ओळखले जाते. हे मंदिर सुंदर बागांनी वेढलेले आहे. मेजीच्या काळात टोमितारो हारा या जपानी व्यावसायिकाने ते विकत घेतले होते. 1923 च्या ग्रेट कांटो भूकंपामुळे मंदिराचे वास्तुशिल्पाचे मोठे नुकसान झाले आणि पुन्हा बांधण्यासाठी 10 वर्षे लागली.

मंदिरात स्मशानभूमी देखील आहे आणि तेथे अनेक सेलिब्रिटी दफन झाले आहेत. मंदिराच्या मुख्य भिक्षुणीचे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जात असे. काही वेळा अशा काही शाही स्त्रिया देखील घडल्या आहेत ज्या आपल्या पतीच्या मृत्यूनंतर नन बनल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT