Diwali Skin Care esakal
लाइफस्टाइल

Diwali Skin Care : दिवाळीमध्ये चेहऱ्यावर ग्लो हवाय? मग, ट्राय करा ‘हे’ घरगुती फेसपॅक्स

दिवाळीमध्ये चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी हे घरगुती फेसपॅक्स ठरतील फायदेशीर.

Monika Lonkar –Kumbhar

Diwali Skin Care : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या आधी सर्वजण घरांची स्वच्छता आणि साफसफाई करतात. स्वच्छता आणि साफसफाई झाली की, मग घर सजावटीची तयारी करतात. त्यामुळे, दिवाळीमध्ये घर सुंदर, स्वच्छ आणि आकर्षक दिसते.

दिवाळीमध्ये जशी आपण घराची काळजी घेते तशी आपण स्वत:ची देखील काळजी घ्यायला हवी. दिवाळीमध्ये आपण नवे कपडे घालतो, मस्त मेकअप करतो. मात्र, दिवाळीपूर्वी त्वचेची देखील खास काळजी घ्यायला हवी, जेणेकरून दिवाळीमध्ये त्वचा छान ग्लो करेल.

दिवाळीमध्ये त्वचा छान ग्लो असावी आणि आपण सुंदर दिसावे, अशी देखील अनेक महिलांची इच्छा असते. मग, त्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये पैसे कशाला खर्च करायचे? म्हणूनच आज आम्ही खास दिवाळीमध्ये सुंदर दिसण्यासाठी घरगुती फेसपॅक्सबद्दल सांगणार आहोत. जे तुम्ही अगदी घरच्या घरी झटपट बनवू शकता.

दही आणि लिंबू

आपला चेहरा छान मॉईश्चराईझ करण्यासाठी दही अतिशय फायदेशीर आहे. दह्यामुळे चेहरा मऊ आणि सॉफ्ट होण्यास मदत होते. लिंबामध्ये व्हिटॅमीन सी चे प्रमाण भरपूर असल्यामुळे याचा वापर केल्यावर आपल्या चेहऱ्यावर छान चमक येते. त्यामुळे, हे दोन्ही घटक आपला चेहरा ग्लो करण्यासाठी फायदेशीर आहेत.

हा फेसपॅक तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये ३-४ चमचे लिंबाचा रस घ्या. आता त्यामध्ये २-३ चमचे दही मिक्स करा. आता, ही पेस्ट चांगली मिक्स करून चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. चेहरा धुतल्यानंतर, मॉईश्चरायझर लावायला विसरू नका. हा फेसपॅक तेलकट त्वचेसाठी अतिशय उत्तम आहे. या फेसपॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो नक्कीच येईल.

बटाटा आणि मध

हा फेसपॅक तयार करण्यासाठी १ बटाटा घ्या. तो सोलून किसून घ्या. किसल्यानंतर एका गाळणीच्या मदतीने त्याचा रस काढा. आता या बटाट्याच्या रसामध्ये १ किंवा २ चमचे मध मिसळा. यात हवे तर तुम्ही गुलाबजलचे १-२ थेंब ही घालू शकता.

आता हा फेसपॅक चेहऱ्यावर आणि मानेजवळ लावा. २०-२५ मिनिटांनंतर चेहरा धुवून टाका. या फेसपॅकमुळे तुमच्या चेहऱ्याला एक वेगळीच चमक मिळते. तुमच्या चेहऱ्यावर लगेच ग्लो येण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wakad Hinjewadi News : वाकड, हिंजवडीत अनधिकृत पार्किंगमुळे कोंडी; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष; नागरिकांकडून कारवाईची मागणी!

Mutual Fund : काय आहे Active आणि Passive म्युच्युअल फंड? जाणून घ्या म्युच्युअल फंडमधील रिस्क आणि रिटर्न!

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : 26 तारखेच्या बैठकीत युवा स्वाभिमान पार्टीची भूमिका स्पष्ट करू - नवनीत राणा

SCROLL FOR NEXT