Diwali 2023 esakal
लाइफस्टाइल

Diwali 2023 : दिवाळीला पोह्यांहुन अधिक पौष्टिक अन् कुरकुरीत लाह्याचा चिवडा नक्की करून पहा

या लाह्या मक्याच्या नाही तर, जोंधळ्याच्या आहेत

Pooja Karande-Kadam

 Diwali 2023 :

दिवाळीत काही दिवस जेवण न करता फक्त लाडू अन् चिवड्यावर दिवस काढणारे चिवडा लव्हर्स आहेत. चिवड्यासोबत लाडू हे समिकरण ऐकूणच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. चिवड्याचे अनेक प्रकार आहेत. पण दिवाळीला मात्र पोह्यांचाच चिवडा केला जातो.

पोहे तळून अन् भाजके अशा दोन्ही प्रकारचा चिवडा तयार होतो अन् तो स्वादिष्टही असतो. पण, यंदाच्या दिवाळीला जरा पौष्टिक अन् लगेचच फस्त होईल अशी चव असलेला चिवडा बनवायचा असेल तर लाह्यांचा चिवडा तुम्ही बनवू शकता.

या लाह्या मक्याच्या नाही तर, जोंधळ्याच्या आहेत. तुम्हाला या चिवड्यासाठी जोंधळ्याच्या लाह्या लागणार आहेत.  

साहीत्य - ४ वाट्या जोंधळ्याच्या किंवा साळीच्या लाह्या, १ वाटी दाणे, अर्धी वाटी खोबऱ्याचे पातळ काप, भरपूर कढीलिंब, २ टेबलस्पून साजूक तूप, अर्धा टी. स्पून काळे मीठ, साधे मीठ, जिरे, मोहोरी, हळद, १०-१२ हिरव्या मिरच्यांचे तुकडे.

कृती -

चिवडा करण्यापूर्वी जोंधळ्याच्या लाह्या नीट चाळून निवडून घ्याव्या. साळीच्या लाह्या घेतल्या तर चाळून त्याची भात तुसाची नाकं काढून निवडून घ्याव्यात व उन्हात ठेवाव्यात.

कढईत साजूक तूप घालून त्यात मोहरी, जिरे, थोडी हळद, मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, दाणे व खोबऱ्याचे काप घालून मंद आचेवर खमंग फोडणी करावी. दाणे खमंग तळले गेले की त्यातच सैंधव मीठ घालावे गॅस बंद करून लाह्या घालाव्यात

चविनुसार मीठ आवडत असल्यास २ टी स्पून पीठीसाखर, घालून नीट ढवळून घ्यावे.

फोडणी सर्वत्र सारखी लागली की गॅस परत सुरू करून मंद आचेवर चिवडा लाह्या कुरकुरीत होईपर्यंत परतावा व गार झाल्यावर डब्यात भरावा.

टीप :  

साजूक तुपातल्या फोडणीने स्वादिष्ट होतो, तेल वापरायला हरकत नाही.  दाण्यांऐवजी फुटाणे वापरले तरी उत्तम होतो. साळीच्या लाह्या उन्हात वाळवून त्याला नुसता साजूक तूप मीठाचा हात लावून बशीत किंवा वाटीत लहान मुलांपुढे ठेवावा (१० महिने, १ वर्षाची) मुलं हाताने या लाह्या आवडीने खातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT