Diwali 2023  esakal
लाइफस्टाइल

Diwali 2023 : जातीभेदाच्या पलिकडे! हिंदू-मुस्लिम समाज एकत्र येऊन साजरा करतो दिवाळी, अनेक वर्षांची आहे परंपरा!

देशात अशीही काही ठिकाणे आहेत जिथे जाती-धर्मापलिकडील दिवाळी साजरी होते

Pooja Karande-Kadam

Diwali 2023 :

दसऱ्यानंतर दिवाळीची प्रतिक्षा सगळे करत असतात. दिवाळीची तयारीही सुरू झाली आहे. फराळ, सजावट अन् खरेदीमुळे दिवाळीच्या उत्साहाला उधाण आले आहे. दिवाळी साजरी करण्यामागे प्रत्येकाच्या काही ना काही प्रथा परंपरा आहेत. दिवाळीला प्रत्येकजण फराळ बनवतो पण त्यांची पद्धत, पदार्थ वेगवेगळे असतात.

दिवाळीत घरोघरी, मंदिरात दिवे लावून माता लक्ष्मीची पूजा केली जाते. दिवाळी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. दिवाळीत सगळ्याच हिंदू घरात दिवाळी साजरी होते. पण, देशात अशीही काही ठिकाणे आहेत जिथे जाती-धर्मापलिकडील दिवाळी साजरी होते.

राजस्थानमधील झुंझुनू या ठिकाणी असलेल्या दर्ग्यात हिंदू आणि मुस्लिम समाजातील लोक एकत्र येत दिवाळी साजरी करतात. भारतात अनेक ठिकाणी आपल्याला हिंदू मुस्लिम ऐक्य पहायला मिळतं. राजस्थानात होणार दिवाळीही त्याचेच प्रतिक आहे.

दिवाळी दिवशी हिंदू आणि मुस्लिम समाजातील लोक एकत्र दिवाळी साजरी करतात. या दिवशी येथे दिवे लावले जातात. फटाके फोडून आणि मिठाई देऊन आनंद साजरा करतात. दर्गा कमरुद्दीन शाह असे या दर्ग्याचे नाव आहे.

कमरुद्दीन शाह दर्ग्यात दिवाळी साजरी करण्याची ही परंपरा सुमारे 250 वर्षांपासून सुरू आहे. दर्ग्याचे कामकाज पाहणारे एजाज नबी सांगतात की, एके काळी सुफी संत कमरुद्दीन हे चचलनाथ टीलेचे संत चंचलनाथ जी यांचे मित्र होते.

दोघेही एकमेकांना भेटले तर एक गुहेतून दर्ग्यातून तर दुसरा संत आश्रमातून बाहेर पडायचे. दोघेही वाटेत बाजारात भेटायचे.

दोघेही कार्यक्रमांना एकत्र येत असत. या परंपरेनुसार आता दिवाळी केवळ दर्ग्यातच साजरी केली जात नाही, तर चंचलनाथ टिळा येथील कार्यक्रमातही सहभागी होतात. ही परंपरा आजही कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT