Diwali  sakal
लाइफस्टाइल

Diwali 2023: दिवाळीत पणत्या लावताना या गोष्टींची घ्या काळजी; सुरक्षित आणि आनंदी दिवाळी साजरी करा...

दिवाळीत चटका बसणे, कपडे जळणे, अशा गोष्टी बऱ्याचदा घडतात. हे टाळायचं तर या काही गोष्टींची काळजी नक्की घ्या..

Aishwarya Musale

दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. दिवाळीच्या चार दिवसांत आपण आपल्या घरात, अंगणात, रांगोळीमध्ये असे ज्याठिकाणी दिवे लावतो आणि दिपोत्सव साजरा करतो. पुराणातील कथांनुसार दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येत परतले होते. रावणाचा वध करून ते अयोध्यानगरीत आल्यानंतर अयोध्या नगरी दिव्यांनी उजळवण्यात आली होती.

सुख-समृदी वाईट किंवा अंधार दूर करून दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सकारात्मकता आणणारा सण म्हणजे दिवाळी. 

आनंद आणि समृद्धीची इच्छा बाळगण्यासाठी दिवाळीपेक्षा आणखी कोणता सण नाही, या निमित्ताने लक्ष्मीचीही पूजा केली जाते. दिवाळीबरोबरच धनत्रयोदशी, वसूबारस, पाडवा आणि भाऊबीज असे सणही साजरे केले जातात.धनत्रयोदशीपासून या दीपावलीची सुरुवात होते. दिव्यांची आरास, दारासमोर रांगोळी नवीन कपडे आणि फराळ करण्याची पद्धत आहे.

सुख-समृद्धीचे प्रतीक असलेला हा सण साजरा करत असताना घरात व अंगणात दिवे लावताना, विद्युत रोषणाई करताना वास्तुशास्त्रानुसार थोडी काळजी घेण्याची गरज आहे. 

उत्साहाच्या भरात हा दिपोत्सव आपल्याच अंगलट येतो आणि त्यातूनच चटका बसण्याच्या, कपडे जळण्याच्या घटना घडतात. असा प्रकार आपल्या घरी होऊ नये, यासाठी दिपोत्सव  साजरा करताना या काही गोष्टींची  काळजी नक्की घ्या.

● तुमच्या घरात लहान मुले असतील तर शक्यतो पायऱ्यांवर, अंगणामध्ये दिवे लावू नका. कारण कारण कपड्याला आग लागण्याची शक्यता असते.

● बॅटरीवर चालणाऱ्या कृत्रिम दिव्यांचा वापर करा.अनेक जण गॅलरीमध्ये किंवा घराच्या कम्पाउंड वॉलवर दिवे लावतात. 

● चुकून धक्का लागून खाली पडण्याची शक्यता असते. अशावेळी खाली कुणी उभं असेल तर अपघात होऊ शकतो.

● रांगोळीमध्ये शक्यतो एकच मोठा दिवा लावा आणि तो ही रांगोळीच्या मधोमध. 

● हँगिंग दिवे शक्यतो लावू नका.

● दिवे लावताना आपण ते सगळे एका ताटात घेतो आणि मग एकेका जागी नेऊन ठेवतो. 

● ते ताट खूप उथळ नाही ना, दिवे व्यवस्थित बसले आहेत ना, याची काळजी घ्या. 

● पुजेच्या चौरंगाच्या अगदी जवळ दिवा ठेवू नका. पूजा करताना चुकून चटका बसू शकतो.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात कुठं असं होतं का? प्रकल्प रखडल्यानं फडणवीस कंत्राटदारांवर संतापले, म्हणाले, १५ दिवसात पूर्ण करा

IPL 2026 Update: काव्या मारनचा धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, असं करण्याची खरच गरज आहे का? सनरायझर्स हैदराबाद...

Latest Marathi News Live Update : मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा खडाजंगी

Rahul Dravid Son: द्रविडचा धाकटा लेक गाजवतोय मैदान; BCCI च्या वनडे स्पर्धेसाठी झाली संघात निवड

Pension Service : पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी ! आता बँकेत न जाताच घरबसल्या मिळणार लाइफ सर्टिफिकेट सेवा! जाणून घ्या कशी?

SCROLL FOR NEXT