Cow Dung Festival in diwali karnataka  esakal
लाइफस्टाइल

Diwali 2023 : तामिळनाडूतल्या गावातील लोक शेणात लोळून साजरी करतात दिवाळी, उत्सवाला आहे आरोग्यदायी महत्त्व!

हे लोक दिवसभर शेणात लोळतात अन् एकमेकांना शेणाचे गोळेही फेकून मारतात

Pooja Karande-Kadam

Diwali 2023 : भारताचा उल्लेख जेव्हा होतो तेव्हा इथल्या धार्मिक संस्कृतीबद्दल हमखास बोलले जाते. आपल्या संस्कृतीत हिंदू, मुस्लिम ऐक्य आहे. ख्रिश्चन, पारसी, सिंधी, कन्नड,तामिळ अशा अनेक धर्माचे लोक राहतात. त्य प्रत्येकाचे एक वैशिष्ट्य आहे. अन् प्रत्येक गावात या सगळ्या धर्माचे लोक सुखाने राहतात.

गावांचा विचार केला प्रत्येक गावाची वेगळी अशी परंपरा आहे. आता दिवाळीचच घ्या. दिवाळीला दक्षिण भारतात फारसे महत्त्व नाही तर उलट उत्तर भारतात दिवाळीहून मोठा सण कोणता नाही. दिवाळीत येणाऱ्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पद्धती पहायला मिळतात.

काही ठिकाणी लोक दिवाळीचा सण अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. दरवर्षी तामिळनाडू आणि कर्नाटक सीमेवरील गुमतापुरा गावातील लोक एकमेकांवर शेण फेकून दिवाळी सणाचा आनंद घेतात. याला स्थानिक भाषेत गोर्‍हाबा उत्सव असेही म्हणतात.

गुमतापुरा गावातील स्थानिक लोक अनेक दशकांपासून हा सण साजरा करत असल्याचे सांगितले जाते. गुमतापुरा गावात राहणारे अनेक तरूणच नाहीतर वडिलधारी मंडळीही या उत्सवात सहभागी होतात. (Diwali 2023)

कशी असते पूर्वतयारी

उत्सव जवळ आला की गावातील लोक गावातील गायी पाळणाऱ्या लोकांच्या घरी जाऊन शेण गोळा करतात. यानंतर काही पूजा किंवा स्थानिक परंपरेनुसार गायीचे शेण ट्रॅक्टरने गावातील मंदिरात आणले जाते. त्यानंतर हे मंदिराजवळच्या मोकळ्या जागेत ठेवले जाते. लोक तिथे जमतात आणि एकमेकांवर शेण फेकतात.

हा खेळ बराच काळ चालू राहतो. ते शेण हातात धरून एकमेकांवर फेकताना दिसत आहेत. या उत्सवात लोक खूप आनंदी दिसतात. मुलंही या उत्सवात सहभागी होऊन आनंद लुटतात.

असा हा कार्यक्रम दिवसभर सुरू असतो

काय आहे मान्यता

पूर्वी गावागावात साथीचे आजार पसरायचे. तेव्हा अशा आजारांपासून रक्षण व्हावं म्हणून गायीचे गोमूत्र अन् शेणाचा हा खेळ सुरू झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गायीच्या शेणामुळे आजार दूर पळतात, असेही म्हटले जाते. त्यामुळेच लहान मुंल, तरूण, वयोवृद्ध पुरूषही यात सहभागी होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, पण सुरक्षा कच्ची! बीएमसी मुख्यालयातील बॅग स्कॅनर बंद; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Tenancy Agreement Rule: भाडेकरू आणि घरमालकांनो लक्ष द्या... सरकारकडून ‘नवीन भाडे करार २०२५’ लागू; काय आहेत नवे नियम?

Dondaicha News : दोंडाईचा नगर परिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय; नगराध्यक्षांसह ७ नगरसेवक बिनविरोध

Kolhapur Shivaji University: पदव्युत्तर अभ्यासकेंद्रांना कुलूप, अभ्यासक्रम बंद करण्यासाठी महाविद्यालयांचा प्रस्ताव

Jaykumar Rawal : तोंडाला फेस आणणारी घोडदौड; दोंडाईचा निवडणुकीत नगराध्यक्षपद व ७ जागा बिनविरोध, मंत्री जयकुमार रावल यांचा वरचष्मा

SCROLL FOR NEXT