Overuse Of Smartphone is Dangerous  sakal
लाइफस्टाइल

Side Effects Smartphone Overuse: तुम्हीही स्मार्टफोनचा अतिवापर करता का? जाणून घ्या 'हे' गंभीर परिणाम आणि उपाय!

Overuse Of Smartphone Is Harmful For Health: सतत फोनवर ऍक्टिव्ह राहिल्यामुळे आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. झोपेच्या समस्या, शारीरिक आणि मानसिक समस्या, नातेसंबांधांमध्ये वादविवाद अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागते.

Anushka Tapshalkar

थोडक्यात:

  1. स्मार्टफोनच्या सतत वापरामुळे झोप, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

  2. तरुणांमध्ये स्मार्टफोनचा अतिरेक वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करतो.

  3. ही समस्या इतकी गंभीर झाली आहे की तिला सार्वजनिक आरोग्य महामारी मानले जात आहे.

Extreme Use of Smartphone Causes Health Issues: स्मार्टफोनची सवय आज आधुनिक जीवनशैलीसाठी एक मोठा धोका ठरली आहे. स्मार्टफोनने आपली काम करण्याची, आराम करण्याची आणि समाजाशी जोडण्याची पद्धत बदलली आहे. पण सतत फोनवर अॅक्टिव राहण्यामुळे त्याचे गंभीर स्वरूपाचे परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात.

फोनच्या भरपूर वाढलेल्या उपयोगामुळे झोप, मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि वैयक्तिक नातेसंबंधांवरही वाईट परिणाम होतो, विशेषतः तरुण व युवावर्गामध्ये. या समस्येला सार्वजनिक आरोग्य महामारी मानले जाते.

स्पेनने यावर एक महत्त्वाचा पाऊल उचलले आहे. स्पेनमध्ये सर्व स्मार्टफोनवर सिगारेट पॅकेटांवर असलेल्या आरोग्य सुचानांसारखी सूचना लागू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. याचा उद्देश अत्याआधिक स्क्रीन टाईममुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्येबाबत जागरूकता वाढवणे आणि फोनच्या विचारपूर्वक वापरासाठी लोकांना प्रेरित करणे हा आहे.

लोक जास्तीत जास्त वेळ फोनवर घालवतात, त्यांना हृदय विकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक, ब्लड प्रेशर, वजन वाढणे, स्त्रियांमध्ये हार्मोनल बदल होणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. या सगळ्या संशयनमध्ये मात्र हृदय विकाराच्या झटक्याचा धोका हा जास्त प्रमाणात असतो. हे संशोधन १९९० ते १९९१ मध्ये जन्मलेल्या जवळपास १४,५०० लोकांवर करण्यात आले आहे.

स्मार्टफोनच्या अतिवाढलेल्या वापरामुळे खालील आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात:

हृदयविकाराचा धोका

ज्यांची शारीरिक हालचाल कमी असते आणि जास्त वेळ स्मार्टफोन वापरतात, त्यांना हृदय विकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक धोका मोठ्या प्रमाणावर असू शकतो.

शारीरिक हालचाल नसणे व लठ्ठपणा

रिसर्चनुसार, जे स्मार्टफोनवर जास्त वेळ आहेत, त्यांची शारीरिक हालचाल कमी होते. त्यातून त्यांच्यामध्ये लठ्ठपणा , टाइप-2 डायबिटीज आणि इतर गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो.

न्यूरोडीजेनेरेटिव्ह आजार

कमी शारीरिक हालचालींमुळे न्यूरोडीजेनेरेटिव्ह आजार विकसित होण्याचा धोका असू शकतो.

स्मार्टफोनच्या अतिवापराच्या या परिणामांवर नियंत्रण ठेवणं आणि वेळेवरच फक्त त्याचा उपयोग करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे, स्मार्टफोनच्या वापराबद्दल जागरूकता असणे आणि जीवनशैलीत बदल करणे अतिशय आवश्यक आहे.

स्मार्टफोनच्या अधिक उपयोगामुळे होणाऱ्या इतर समस्या

- कंप्यूटर विजन सिंड्रोम (डोळ्यांवर परिणाम)

- पाठीचा कण्यावर गंभीर परिणाम

- त्वचेशी संबंधित समस्या

- झोप कमी होणे

- मानसिक त्रास वाढणे

- आत्मविश्वास कमी होणे

FAQs

1. स्मार्टफोनचा अतीवापर केल्याने कोणते शारीरिक आजार होऊ शकतात? (What physical health problems can occur due to excessive smartphone use?)

स्मार्टफोनचा अतिवापर केल्यामुळे हृदयविकार, ब्रेन स्ट्रोक, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, टाइप-2 डायबिटीज, पाठीच्या मणक्याशी संबंधित समस्या, डोळ्यांचे आजार (Computer Vision Syndrome) अशा अनेक आजारांचा धोका वाढतो.

2. स्मार्टफोनच्या सतत वापराचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो? (How does constant smartphone use affect mental health?)

सतत स्क्रीनवर राहिल्यामुळे तणाव, चिंता, झोपेचा अभाव, आत्मविश्वास कमी होणे आणि सामाजिक अलगाव यासारखे मानसिक त्रास वाढतात.

3. तरुणांमध्ये स्मार्टफोनचा अतीव वापर किती धोकादायक आहे? (How dangerous is excessive smartphone use among youth?)

तरुणांमध्ये स्मार्टफोनच्या अतीवापरामुळे शारीरिक हालचाल कमी होते, त्यातून लठ्ठपणा, हार्मोनल असंतुलन, झोपेच्या समस्या आणि मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. दीर्घकालीन परिणाम गंभीर स्वरूपाचे असू शकतात.

4. स्मार्टफोनचा वापर मर्यादित ठेवण्यासाठी काय करायला हवे? (What can be done to limit smartphone usage?)

स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा, झोपेच्या एक तास आधी फोन न वापरणे, सततच्या नोटिफिकेशन्स बंद करणे, फोनऐवजी शारीरिक किंवा सामाजिक क्रियाकलाप निवडणे, डिजिटल डिटॉक्सचे नियोजन करणे

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: कर्णधार सूर्यकुमार यादव भारताकडून खेळणार की नाही? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra Tourists in Uttarakhand Video : मोठी बातमी! उत्तराखंडमधील महासंकटात अडकले महाराष्ट्रातील दहा पर्यटक

Uttarkashi Cloudburst Latest Update : उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार! ५० पेक्षा अधिक नागरिक बेपत्ता, १० भारतीय लष्काराच्या जवानांचाही समावेश...

Latest Maharashtra News Updates Live : देश विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Best Employees Morcha: बेस्ट सेवानिवृत्त कामगारांचा आझाद मैदानात मोर्चा, काय आहेत मागण्या?

SCROLL FOR NEXT