Hair transplant
Hair transplant esakal
लाइफस्टाइल

हेअर ट्रान्सप्लांट कितपत प्रभावी आहे? वाचा डॉक्टर काय सांगतात...

सकाळ डिजिटल टीम

हेअर ट्रान्सप्लांट (Hair transplant) सध्या काळाची गरज ठरत आहे. आजच्या युगात केस गळणे, अकाली टक्कल (Premature baldness) पडणे अशा अनेक गोष्टींनी आजची युवा पिढी त्रस्त आहे. केस गळण्यामुळे (Hair loss), अकाली टक्कल पडल्यामुळे आत्मविश्वास (Confidence) खच्चीकरण होत आहे, डिप्रेशन (Depression) अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत. आधीच्या काळात चाळिशीनंतर येणारे टक्कल आजच्या धकाधकीच्या स्पर्धात्मक जीवनात तणाव, भेसळयुक्त जेवण, प्रदूषण, बदलत चाललेली जीवनशैली (Lifestyle) या सर्वांमुळे विशीतच यायला लागले आहे.
टक्कल पडले की वय जास्त दिसते, आत्मविश्‍वास कमी होतो. त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम दिसायला लागतो. हा गेलेला आत्मविश्‍वास हेअर ट्रान्सप्लांट करून परत मिळविता येतो. पण, हेअर ट्रान्सप्लांटचे रिझल्ट हे कितपत प्रभावी आहेत, हा प्रश्‍न प्रत्येक रुग्णाच्या मनात येतो आणि अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे डॉ. मनोज बच्छाव (प्लॅस्टिक ॲन्ड कॉस्मेटिक सर्जन) आपल्याला देणार आहेत.

प्रश्‍न : केसगळतीवर हेअर ट्रान्सप्लांट हाच उपाय आहे का?
उत्तर : केसगळतीवर बऱ्याच उपचारपद्धती उपलब्ध आहेत. केसगळतीचे प्रमाण कमी असल्यास औषधोपचार, पीआरपी व मिझोथेरपीने केसांची डेन्सिटी वाढविता येते व केसगळती अधिक असल्यास हेअर ट्रान्सप्लांट करता येते.

प्रश्‍न : हेअर ट्रान्सप्लांटचा सक्सेस रेट किती आहे व तो कोणत्या बाबींवर अवलंबून आहे?
उत्तर : हेअर ट्रान्सप्लांट अतिशय यशस्वी अशी उपचारपद्धती आहे. पण, तिचा सक्सेस रेट हा काही गोष्टींवर अवलंबून आहे जसे की
१) सर्जनचे अनुभव व कौशल्य : कारण तुमचा सर्जन ठरवितो किती टक्कल आहे, त्याला किती ग्राफ्ट लागतील व ते डोनर एरियामधून कशा पद्धतीने काढले जावेत, काढताना केसांच्या मुळाला धक्का न लागता काढले जावेत, जेणेकरून काढला जाणारा प्रत्येक केस यशस्वीपणे टक्कल असलेल्या जागी उगवला पाहिजे.
२) शस्त्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या मशिनरी : हेअर ट्रान्सप्लांटमध्ये वापरली जाणारी मशिनरी ही अतिशय महत्त्वाची असते. केस मुळासकट काढण्यासाठी वापरली जाणारी मायक्रोमोटर, त्याचा स्पीड, वापरले जाणारे पंचेस हे किती शार्प आहेत यावरही काढल्या जाणाऱ्या केसांच्या मुळाची गुणवत्ता अवलंबून असते.
३) हेअर ट्रान्सप्लांट कुठे होत आहे : ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. इंटरनॅशनल प्रोटोकॉल्सनुसार हेअर ट्रान्सप्लांट स्पेशल ओटी सेटअपमध्ये केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. ज्यामध्ये सर्व असेप्टिक कंडिशन्समध्ये शस्त्रक्रिया केली जाते व इमर्जन्सी कंडिशनसाठी बॅकअपही असतो. त्यामुळे हेअर ट्रान्सप्लांटनंतर होणारे कॉम्प्लिकेशन्स, इन्फेक्शन टाळता येतात व १०० टक्के रिझल्ट येण्यास मदत होते.

प्रश्‍न : हेअर ट्रान्सप्लांट का फेल होतात?
उत्तर : हेअर ट्रान्सप्लांट फेल होण्याची बरीच कारणे आहेत. जसे की आपण कोणाकडे हेअर ट्रान्सप्लांट करून घेत आहात : आपले डॉक्टर प्लॅस्टिक सर्जन अथवा ट्रेन्ड डर्मेटोलॉजिस्ट आहेत का? ते स्वतः सर्जरी करणार आहेत की कोणी टेक्निशियन आपली सर्जरी करत आहे. कारण हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी ही केवळ टेक्निकल नसून आर्टिस्टिकसुद्धा आहे. तुमच्या सर्जनलाच या गोष्टी माहीत आहेत की, केसाच्या मुळाला धक्का न लागता तो कशा पद्धतीने काढला गेला पाहिजे. कमीत कमी वेळात तो टक्कल पडलेल्या ठिकाणी कुठल्या डिरेक्शनमध्ये व किती डेन्सिटीमध्ये प्रत्यारोपित केला गेला पाहिजे, जेणेकरून येणारा रिझल्ट नैसर्गिक व उत्तम येईल. बऱ्याच वेळा हेअर ट्रान्सप्लांट करणारी व्यक्ती अनुभवी अथवा तितकी कुशल नसल्यास व योग्य मशिनरी नसल्यास केस काढताना मुळाला धक्का लागून ते अर्धवट बाहेर काढले जातात. त्यामुळे तो टाकला जाणारा ग्राफ्ट फेल जातो. यालाच ट्रांजेक्शन रेट असे म्हणतात.

प्रश्‍न : हेअर ट्रान्सप्लांटचा नैसर्गिक रिझल्ट येतो का?
उत्तर : हा ट्रान्सप्लांटचा रिझल्ट अतिशय नैसर्गिक येऊ शकतो. हा तीन गोष्टींवर अवलंबून आहे. त्यामध्ये १) डेन्सिटी : केस प्रत्यारोपित करताना जर ते योग्य डेन्सिटीमध्ये टाकले गेले तर येणारा परिणाम अतिशय नैसर्गिक दिसतो. २) दिशा (Direction) काढलेला केसाचा ग्राफ्ट कुठल्या दिशेमध्ये टाकला जात आहे. त्यानुसार त्याची वाढ होते. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचे आहे ही टाकला जाणारा प्रत्येक ग्राफ्ट हा ऑलरेडी असलेल्या केसांच्या दिशेमध्ये टाकला गेला पाहिजे. ३) हेअर लाइन : साधारणता केस प्रत्यारोपणनंतरचा तुमचा लुक तुमच्या हेअर लाइनवर अवलंबून असतो. आपण कधी साधारण व्यक्तीच्या हेअरलाइनला बघितल्यास ती कधीच सरळ नसते. नेहमी क्रिस क्रॉस असते. त्या पद्धतीने केस प्रत्यारोपित केले गेले पाहिजेत. ४) सर्जनचे कौशल्य व अनुभव : डिरेक्शन, डेन्सिटी, हेअर लाइन या सर्व गोष्टी तुमच्या सर्जनच्या कौशल्यावरही अवलंबून असतात.

प्रश्‍न : हेअर ट्रान्सप्लांटचे काही कॉम्प्लिकेशन आहेत का?
उत्तर : हेअर ट्रान्सप्लांट ही अतिशय सेफ सर्जरी आहे, पण त्यासाठी आपण कुठे सर्जरी करत आहोत? स्वतः सर्जन आपली सर्जरी करत आहे का? ओटी सेटअपमध्ये आहे का? सर्व इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स फॉलो करून शस्त्रक्रिया केली जात आहे का? हेअर ट्रान्सप्लांट आधी मेडिकल व्हॅल्युएशन व फिजिकल फिटनेस करून घेण्यात आली आहे का? शस्त्रक्रियेदरम्यान काही कॉम्प्लिकेशन्स झाल्यास इमर्जन्सी बॅकअप हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे का? आपली शस्त्रक्रिया डॉक्टर सेंट्रिंक हॉस्पिटल अथवा क्लिनिकमध्ये होत आहे की गुणवत्ता नियंत्रित नसलेल्या व येणाऱ्या परिणामाला जबाबदार नसलेल्या कमर्शिअल चेन क्लिनिकमध्ये होत आहे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. या सर्व बाबींची उत्तम चौकशी करून हेअर ट्रान्सप्लांट केल्यास १०० टक्के यशस्वी होऊ शकते व कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात.

- डॉ. मनोज बच्छाव, प्लॅस्टिक ॲन्ड कॉस्मेटिक सर्जन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT