Mental Health esakal
लाइफस्टाइल

Mental Health : ऑफिसमध्ये बॉसच्या बोलण्याने तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो? रिपोर्ट सांगतो...

ऑफिसच्या कामाचा कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर कशाप्रकारे परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी दहा देशांतील 3,400 लोकांचे सर्वेक्षण केले.

साक्षी राऊत

Mental Health : आपण ज्या ठिकाणी काम करतो तिथे कामाचं प्रेशर, बॉसची बोलणी या प्रत्येकाचाच आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. जर तुमचे सहकारीसुद्धा तुम्हाला समजून घेत नसतील किंवा तुमच्यात को-ऑर्डिनेशन नसेल तर तुमची चिडचिड होते. कर्मचाऱ्यांच्या या मानसिकतेवर आणखी नव्याने अभ्यास करण्यात आलाय.

UKG मध्ये वर्कफोर्स इंस्टिट्युटने केलेल्या अभ्यासात ऑफिसमधील बॉसच्या बोलण्याचा आणि एकंदरित ऑफिसच्या कामाचा कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर कशाप्रकारे परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी दहा देशांतील 3,400 लोकांचे सर्वेक्षण केले.

सर्वेक्षणाच्या अभ्यासातून असे आढळून आले की, तुमच्या लिडर्स आणि मॅनेजरचा कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर त्यांनी कधी विचार केला नसेल तेवढा जास्त प्रभाव पडतो. या अभ्यासात 78% टक्के लोकांनी कबूल केले की त्यांच्या तणावाचा त्यांच्या कामावर नकारात्मक प्रभाव पडतो. तरीसुद्धा 38% लोक "क्वचित" किंवा "कधीतरीच" त्यांच्या मॅनेजरशी याबाबत बोलले. कारण बहुतेकांचे असे मत होते की त्यांच्या मॅनेजरला त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी नाही आणि ते सतत त्यांच्या कामात व्यस्त असतात. (Lifestyle)

ऑफिसच्या ठिकाणी मानसिक आरोग्य जपण्यासाठी हे काही उपाय करा

ऑफिसच्या ठिकाणी फ्रेश आणि पॉझिटिव्ह राहा. इतर सहकाऱ्यांचे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्या. लहान सहान गोष्टींचा तुम्ही फार विचार केल्यास तुमचे मानसिक आरोग्य आणखी जास्त बिघडू शकते. तसेच तुम्हाला काही अडचणी आल्यास तुमच्या मॅनेजरशी बिनधास्तपणे बोला. काही गोष्टी तुम्ही सांगितल्याशिवाय तुमच्या मॅनेजरला कळणार नाही. (Mental Health)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ZIM: हारला तर बाहेर, जिंकला तरी टेन्शन कायम! भारताच्या सामन्यावर WI च्या निकालाची छाया, सेमीफायनलचं भवितव्य ठरणार

Solapur News: साेलापूरात केंद्र सरकार अन्‌ भाजपविरुद्ध काँग्रेसची निदर्शने; राहुल गांधींना धमकी, हनुमंत पवार यांच्यावरील हल्ल्याचा निषेध!

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाला केंद्राचा 'नो सिग्नल', कारण काय? नव्या मार्गाचा अभ्यास करणार, CM फडणवीसांचं आश्वासन

Latest Marathi News Live Update : दिवाकर रावतेंच्या कार्यकाळात सुरू झालेल्या शिवशाही बसेस होणार बंद

Kolhapur Dead Body News : कोल्हापुरातील मसाई पठारावर अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला, काही दिवसांपूर्वी सुरू होते चित्रपटाचे चित्रीकरण

SCROLL FOR NEXT