Skin Care Products esakal
लाइफस्टाइल

Oily Skin वर चुकूनही लावू नका या 5 गोष्टी, चेहऱ्याची नाजूक त्वचा होईल खराब

चेहऱ्यावर वेगवेगळे स्किन केअर प्रोडक्ट वापरणं टाळावं. जेणेकरून त्वेचवर अतिरिक्त तेल राहाणार नाही आणि त्यामुळे त्वचेला इजाही होणार नाही.

साक्षी राऊत

Skin Care : चमकदार स्किन प्रत्येकालाच आवडते. चमकदाक त्वचेसाठी लोक चेहऱ्यावर खूप सारं मॉश्चरायझर आणि फेस आइल लावतात. मात्र ज्यांची त्वचा नॅचरली ऑइली आहे त्यांच्याबद्दल काय? तेलकट त्वचेवर मुरुम येणं सामान्य आहे. अशावेळी त्यांनी चेहऱ्यावर वेगवेगळे स्किन केअर प्रोडक्ट वापरणं टाळावं. जेणेकरून त्वेचवर अतिरिक्त तेल राहाणार नाही आणि त्यामुळे त्वचेला इजाही होणार नाही.

तेलकट त्वचेमध्ये, त्वचेमध्ये उपस्थित असलेल्या तेल ग्रंथी खूप मोठ्या असतात आणि मोठ्या प्रमाणात तेल तयार करतात. जे चेहऱ्यावर दिसते आणि त्यामुळे छिद्र बंद होतात. ज्यामुळे मुरुमे होऊ लागतात. तज्ञांच्या मते, तेलकट त्वचेवर या गोष्टी लावणे पूर्णपणे टाळावे.

पेट्रोलियम जेली

तज्ज्ञांच्या मते, तेलकट त्वचेवर थिक मॉइश्चरायझर आणि क्रीम लावणे टाळावे. त्याऐवजी जेल बेस्ड मॉइश्चरायझर लावा. हे त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करेल. मॉइश्चरायझर कोरड्या आणि डिहायड्रेट त्वचेसाठी आहे. ज्यामध्ये पॅराफिन, मिनरल ऑइल आणि पेट्रोलियम मिक्स असते. जे तेलकट त्वचेचे छिद्र रोखू शकतात.

कोकोनट ऑइल किंवा फेस ऑइल

आजकाल त्वचा चमकदार दिसण्यासाठी चेहऱ्याला तेल लावण्याची फॅशन झाली आहे. पण तेलकट त्वचेवर तेल लावल्याने छिद्र सहजपणे ब्लॉक होऊ शकतात. त्यामुळे मुरुम आणि रॅशेसची समस्या वाढू शकते.

अल्कोहोल बेस्ड प्रोडक्ट

अनेक ब्युटी केअर आणि मेकअप प्रोडक्ट्समध्ये अल्कोहोल असते. या प्रकारचे प्रोडक्ट वापरणे टाळा. अल्कोहोल बेस्ड प्रोडक्ट त्वचा स्वच्छ आणि हायड्रेट करण्याचे काम करते. पण अल्कोहोल बेस्ड टोनरचा तेलकट त्वचेवर वाईट परिणाम होतो.

यामुळे त्वचा आणखी तेलकट होऊ शकते. टोनर म्हणून नेहमी नॅचरल टोनर जसे की एलोवेरा जेल आणि रोझ वॉटर वापरा. यामुळे तुमची त्वचा नॅचरली मऊ होईल आणि ती कोरडी पडणार नाही. (Cosmetic Product)

स्क्रब

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर हार्श पार्टीकल्सचा स्क्रब वापरू नका. त्यामुळे तुमचे पोअर्स उघडे पडू शकतात. त्यामुळे त्वचा संवेदनशील होते आणि तेलाचे असंतुलन होते. त्वचेवर आणखी पुरळ येऊ लागतात. (Skin Care)

आर्टिफिशीयल कलर

तेलकट त्वचेवर ब्लश, लिपस्टिकसारख्या रंगाच्या गोष्टी लावू नका. बहुतेक ब्लश वगैरे पेट्रोलियम किंवा बिटुमेनपासून बनवलेले असतात. याचा काही त्वचेवर परिणाम दिसून येत नाही, पण त्वचेवर पुरळ येऊ शकतात. आणि त्वचेच्या समस्या वाढू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT