Morning Coffee 
लाइफस्टाइल

Morning Coffee : तुम्हीही सकाळी उठून कॉफी पिता काय? लगेच बंद करा ही सवय, वाचा एक्सपर्टचा महत्वाचा सल्ला

बऱ्याच जणांना असं वाटतं की कॉफी प्यायल्याने झोप उघडण्याबरोबरच एनर्जीही मिळते. मात्र याचा विपरीत प्रभाव तुमच्या आरोग्यावर होतो.

साक्षी राऊत

Morning Coffee : बरेच लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात एका स्ट्राँग कॉफीने करतात. तर काही लोक एनर्जी ड्रिंक तर काही एक्सरसाइज करून दिवसाची सुरुवात करतात. काही लोकांना कॉफी किंवा चहाची एवढी सवय असते की चहा,कॉफी प्यायल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. मात्र तज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्यानंतर एका तासापर्यंत कॉफी पिऊ नये. बऱ्याच जणांना असं वाटतं की कॉफी प्यायल्याने झोप उघडण्याबरोबरच एनर्जीही मिळते. मात्र याचा विपरीत प्रभाव तुमच्या आरोग्यावर होतो.

तज्ञ काय सांगतात?

हॅप्पी बेडचे एक्सपर्ट आणि सीईओ रेक्स इसॅप यांनी सांगितले की, दिवसा तुमचा मेंदू एडेनोसिन नावाचे एक रसायन निर्माण करतं जे झोपेस प्रोत्साहन देतं. जेवढे तुम्ही जागता तेवढे या रसायनाचे प्रमाण वाढत जाते आणि झोप येते. मात्र कॅफीन, एडेनोसिन रयासनाचे प्रमाण कमी करते, ज्यामुळे तुम्हाला झोप येत नाही. त्यामुळे झोपेचा तुम्हाला त्रास असेल तर हेच त्यामागचं प्रमुख कारण आहे. (Health)

कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती?

झोपेतून उठल्यानंतर पुढील एक तास कॉफी पिऊ नये. झोपेतून उठल्यानंतर स्ट्रेस हार्नोन कमी होण्याची वाट बघावी. एका तासाने तुम्ही कॉफी पिऊ शकता. तसेच जेव्हा तुम्ही कॉफी पिता तेव्हा हे लक्षात ठेवा की अतिप्रमाणात कॉफी पिऊ नये. नाहीतर तुम्हाला त्याचा त्रास होईल. एक कॉफी प्यायल्यानंतर पाच ते सात तासानंतरही अर्ध कॅफीन तुमच्या सिस्टिममध्ये असते. ज्यामुळे तुम्हाला रात्री झोपेच्या समस्या जाणवू शकतात. तेव्हा दुपारी २ नंतर कॉफीचे सेवन करू नये. (lifestyle)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT