Ripen Banana esakal
लाइफस्टाइल

Ripen Banana : केळी पिकून काळी पडू लागली म्हणून फेकू नका, फेकण्याऐवजी असा करा वापर

केळी पिकून काळी पडू लागली की ती फेकून देऊ नका तर त्याचा अशाप्रकारे वापर करा.

साक्षी राऊत

Ripe Banana : फळे ही आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. म्हणून आरोग्यतज्ज्ञसुद्धा रोजच्या आहारात फळांचा समावेश करून घेण्याचा सल्ला देतात. काही फळे ही जास्त दिवस टिकतात तर काही फळे ही लवकर खराब होतात. कमी वेळात खराब होणारं फळाचं उत्तम उदाहरण सांगायचं झाल्यास केळ. केळी पिकून काळी पडू लागली की ती फेकून देऊ नका तर त्याचा अशाप्रकारे वापर करा.

अति पिकलेल्या केळीने चेहऱ्यासाठी फेस पॅक बनवा

पिकलं केळ चेहऱ्याव मॅश करून लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. सोबत स्कीन नॅचरली मॉश्चराइज होते. तु्म्ही केळी मॅश करताना त्यात ओट्स आणि मध घालूनही चेहऱ्याला लावू शकता.

केळीपासून बनवा हेअर पॅक

केळी पिकून काळी झाल्यास तुम्ही याचा हेअर पॅक म्हणूनही वापर करू शकता. केळी मॅश करून त्यात खोबरेल तेल मिक्स करा. हा हेअर पॅक केसांच्या मुळापासून ते संपूर्ण केसाला लावा. यामुळे तुमचे केस सॉफ्ट आणि स्मूथ होईल. तसेच तुमच्या केसांना ग्लो मिळेल. या हेअर पॅकने तुमच्या केसांना पार्लरप्रमाणे ट्रिटमेंट मिळेल. पिकून काळी पडलेल्या केळीचे एवढे फायदे वाचून तुम्ही निश्चितच यानंतर काळी केळी फेकणार नाहीत. (banana)

पिकलेल्या केळीची पुरी

केळी फारच पिकलेली असेल तर ही केळी मॅश करून गव्हाच्या पिठात मळून घ्या. केळीच्या पुऱ्या अगदी स्मूद आणि सॉफ्ट बनतील. तुम्ही या पुऱ्या टिफिनवर बटाट्याच्या भाजीसोबतही खाऊ शकता.

पिकलेली केळी यानंतर कधी कचरापेटीत फेकून वाया घालवू नका. तर त्याचा वरील वेगवेगळ्या पद्धतींनी वापर करा. (Lifestyle)

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT