womens day special sakal
लाइफस्टाइल

Womens Day Special : कुटुंबाचे आरोग्य सांभाळणारी स्त्री

कुटुंब लहान असो की मोठं असो स्त्री ही अत्यंत महत्त्वाची घटक आहे. तिच्याशिवाय कुटुंबाचे वर्तुळ पूर्ण होत नाही.

सकाळ वृत्तसेवा

कुटुंब लहान असो की मोठं असो स्त्री ही अत्यंत महत्त्वाची घटक आहे. तिच्याशिवाय कुटुंबाचे वर्तुळ पूर्ण होत नाही.

- डॉ. रूपश्री तांबे

कुटुंब लहान असो की मोठं असो स्त्री ही अत्यंत महत्त्वाची घटक आहे. तिच्याशिवाय कुटुंबाचे वर्तुळ पूर्ण होत नाही. पहाटे लवकर उठणारी आणि सर्व कामे आटोपून रात्री सर्वात उशिरा झोपणारी महिलाच असते. तिला सर्वांची काळजी वाहावी लागते. कामाच्या व्यापात महिलेला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. पण ही माऊली कुटुंबातील सर्वांच्याच आरोग्यावर लक्ष ठेवते.

अनादिकाळापासून आजपर्यंत स्त्रीच्या असंख्य भूमिका सर्वांनी बघितल्या आहेत. रामायणातील सीता, महाभारतातील द्रौपदी, रुक्मिणी, राधा-कृष्ण प्रेम, मीरा-कृष्ण भक्ती, झाशीच्या राणीचे देशप्रेम अशा विविध भूमिकेत जननीचे दर्शन झाले आहे. अर्वाचीन काळात सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, सुब्बलक्ष्मी, लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना कुमारी, मधुबाला, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, नूरजहाँ, गीताबाली, अंजली भागवत, कल्पना चावला, सुनीता विलियम्स या मातब्बर स्त्रियांची नावे विविध क्षेत्रात अजरामर झाली आहेत. या सर्वांनीच आपलं कुटुंब सांभाळूनच आपापल्या क्षेत्रात कामगिरी बजावली. कुटुंबातील सदस्य आरोग्याने परिपूर्ण असले की स्त्रीला मानसिक स्वास्थ्य मिळते. मानसिक स्वास्थ्य चांगले असले की स्वतःच्या विश्वात तिला प्रगती करता येते.

स्त्रीच्या विविध रूपांपैकी आपल्या सर्वांच्या परिचयाचे आणि आपल्या रोजच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असलेले एकरूप आहे अन्नपूर्णेचे. ही अन्नपूर्णा घरातील प्रत्येकाची काळजी घेत असते. सुदृढ आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक कुटुंबाने सुदृढ व सुसंस्कृत असणे ही एका सुसंस्कृत, सुदृढ व विकासशील नैतिक समाजाची गरज आहे. निरोगी शरीर ही यशाची पहिली पायरी आहे. प्रभावशाली व्यक्तिमत्त्वासाठी निरोगी शरीर हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे घरातील सदस्यांसाठी दररोज रुचकर आणि पौष्टिक अन्न तयार करण्याचे अत्यंत महत्वाचे काम महिला करीत असते. मूल जन्माला आल्यानंतर त्याचा आहार, संगोपन, सवयी याची संपूर्ण जबाबदारी स्त्रीवरच असते. स्त्री हीच आई असल्याने संपूर्ण जबाबदारी चोखपणे पार पाडते. वडिलधाऱ्या व्यक्तींची देखभाल, सर्वांच्या आवडीनिवडी, पाहुण्यांचे स्वागत, या सर्वांकडे घरातील स्त्री जातीने लक्ष घालते. स्वयंपाकघरातील पोषक तत्त्वांनी युक्त आहार संपूर्ण कुटुंबाला मिळाला तर सर्वांचे आरोग्य झकास राहील. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यात सर्वात मोठा हिस्सा स्त्रीचाच असतो.

लहान मुलांची पहिली पाच वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात. त्यांच्या बालमनावर झालेले संस्कार त्यांच्या मनात रुजलेल्या त्यांच्या सवयींचा त्यांच्या आयुष्यावर जबरदस्त पगडा असतो. लहानपणी आईवडिलांचा जेवढा जास्त सहवास मिळेल तेवढे त्यांचे आयुष्य अधिक शिस्तबद्ध व प्रेमळ बनतं. काही अपवाद असू शकतात. घरचा वैद्य त्याची आई व आजी याच असतात. घरात आहार शाकाहारी की मांसाहारी असावा हे त्या घरातील स्त्रियाच ठरवितात. आहार आपल्या पोटाला पोषक असायला हवा. मांसाहारापेक्षा जास्त कसदार व श्रेष्ठ आहार शाकाहारच आहे. पण सवयीमुळे व जिभेच्या चोचल्यामुळे काही लोकांना मांसाहार प्रिय असतो. पण मांसाहार घातकच आहे, हे लक्षात ठेवावे. आहार कुठलाही असो, प्रत्येकाला व्यायाम हा आवश्यक आहे. व्यायामामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित ठेवता येतो. स्नायू क्रियाशील राहतात. हाडं मजबूत होतात. स्त्रियांना प्रसूतीच्या वेळी वेदना सहन करण्याची क्षमता निर्माण होते व प्रसूती नैसर्गिकरित्या होऊ शकते. योगासन व प्राणायाम हा शरीराला व मनाला लाभदायक आहे. जगात आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर योगासन व प्राणायाम प्रत्येक स्त्रीने लहानपणापासून करणे गरजेचे आहे.

स्त्रीने प्रसन्न मनाने स्वयंपाक केला की तो स्वास्थ्यवर्धक होतो. याउलट रागाने, उदासीनतेने व आळसाने तयार केलेले अन्न शरीराला अपायकारक असते. मुलाच्या जन्मानंतर आई ही त्याची पहिली गुरू असते. मुलं हे आईच्या आचार-विचाराने प्रेरित होते. आईच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव मुलांवर पडतोच. कुटुंबात सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी वातावरण प्रसन्न चित्तच असायला पाहिजे. उदासीन, कलहपूर्ण, क्रोधमय, अशांत वातावरणाचा प्रभाव त्या घरातील सदस्यांच्या आरोग्यावर पडतो व पौष्टिक आहारसुद्धा मानसिक अशांतीमुळे आरोग्यासाठी उपयुक्त राहत नाही. पन्नाशीनंतर प्रत्येक व्यक्तीने त्याचं आरोग्य अबाधित ठेवायचं असेल तर नियमबद्ध जीवन जगणं आवश्यक आहे. ठराविक आहार योग्य वेळी घेणं महत्त्वाचं आहे. सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, आनंदित राहून दिनचर्या करणे, रात्री आपल्या निजरूपाशी ध्यानमग्न होणे, रात्रीचा आहार कमी करणे, कुटुंबाशी मोकळ्या गप्पा करणे, वेळेवर निद्रामय होणे, आरोग्य अबाधित ठेवण्याचा हा उत्तम मार्ग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT