Happy Parenting Sakal
लाइफस्टाइल

हॅप्पी पेरेंटिंग : ‘आई’ची नऊ रूपं

‘नवरात्रोत्सव’ सुरू झाला, की घरोघरी, विशेषतः स्त्रियांमध्ये, उत्सवाची सुरुवात होते!

डॉ. सुनील गोडबोले, बालविकास तज्ज्ञ.

‘नवरात्रोत्सव’ सुरू झाला, की घरोघरी, विशेषतः स्त्रियांमध्ये, उत्सवाची सुरुवात होते! गंमत म्हणजे याच काळात मुलांचा अभ्यास वाढलेला असतो, सहामाही परीक्षा जवळ येत असतात. मग मुलांना सांभाळायचं कसं आणि ‘आजच्या साडीचा रंग कोणता?’ या कात्रीत ‘आई’ सापडते! या बदलत्या पार्श्वभूमीवर जर नऊ दिवसांतील देवीची नऊ रूपं समजून घेतली, तर मुलांना स्मार्ट आईची नऊ रूपंही लक्षात येतील!

१) शैलपुत्री : शैल म्हणजे पाषाण-अर्थातच स्थिरता, ठामपणा! मुलांना कुठली समस्या आणि दु:ख झालं तरी त्यांच्यामागे ठामपणे उभी राहणारी आई म्हणजे शैलपुत्री. आणि मुलंही त्या भक्कम आधारासाठी आईकडे धाव घेतात.

२) ब्रह्मचारिणी : देवीचं हे रूप ‘आईच्या’ ज्ञानाचं आणि अनुभवातून आलेल्या बुद्धीचं/ शहाणपणाचं प्रतीक आहे. आपल्या लहानपणाचं, आठवून बघा, प्रत्येक छोट्या-मोठ्या प्रश्नाची उत्तरे शोधायला आपण आईकडे धावायचो आणि त्याची उत्तरं मिळायची! त्या उत्तरात कदाचित ‘गुगलची माहिती’ नसेल; पण अनुभवाचं शहाणपण नक्की.

३) चंद्रघंटा : चंद्र हा मनाचं, भावनांचं प्रतीक मानलं जातं. कदाचित म्हणूनच असेल. कोणतंही मूल मन अशांत झालं, की आईकडे धाव घेतं. आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडताना सहज भावनिक संतुलन साध्य होतं.

४) कुष्मांडा : देवीचं हे रूप हे आईतल्या ऊर्जेचं प्रतीक आहे. दिवसभर काम करून थकलेली आई, जेव्हा रात्री उशिरापर्यंत मुलांना झोप येत नाही किंवा त्यांचा अभ्यास घेण्यासाठी जागते, तेव्हा प्रश्न पडतो, की ही ‘ऊर्जा’ येते कुठून?

५) स्कंदमाता : देवीचं हे रूप आईच्या बिनशर्त प्रेमाचं प्रतीक आहे. मुलं आईला काहीही बोलली, ओरडली, कशीही वागली, तरी आई मात्र ‘प्रेमच’ करत राहते!

६) कात्यायनी : देवीचे हे रूप ‘ध्येयाची’ प्रचिती देतं. कुठल्याही प्रसंगात न डगमगता आपल्या मुलांच्या पाठीशी उभी राहणारी आई याच ध्येयाचं उदाहरण आहे!

७) कालरात्री : देवीचं हे रौद्र रूप अंधारावर, भीतीवर विजय दर्शवतं. छोटी मुलं अंधाराला, कडाडणाऱ्या विजेला घाबरून आईच्या पदरामागे उगाच लपत नाहीत

८) महागौरी : देवीचं हे समजायला काहीसं अवघड रूप ‘आंतरिक सौंदर्याचे’ प्रतीक मानलं जातं आणि निसर्गाच्या शक्तीचंही रूप मानलं जातं. मुलांच्या चुकांवर पांघरुण घालणारी क्षमाशील, दयाळू आई ‘महागौरी’च!

९) सिद्धीदात्री : आपल्या मुलांना यश, आरोग्य मिळावं म्हणून आयुष्यभर झगडणारी आई हे याच ‘सिद्धीदात्री’चं रूप! या नवरात्रीनिमित्त आपल्यातल्या प्रत्येकाला आणि स्वतः ‘आईलाही’ स्वतःची ही रूपं समजली, तर ‘पालकपण’ समृद्ध होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT