

Mumbai CNG Supply Crisis
ESakal
मुंबई आणि ठाण्यात अचानक सीएनजी पुरवठा विस्कळीत झाला आहे. महानगर गॅस लिमिटेडने सांगितले की, गेलच्या मुख्य गॅस पाइपलाइनला झालेल्या नुकसानीमुळे ही समस्या उद्भवली आहे. खराब झालेल्या पाइपलाइनमुळे वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशन (सीजीएस) येथे बराच काळ गॅस पुरवठा विस्कळीत झाला. यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक सीएनजी पंपांवर पुरवठा थांबला. मात्र हा पुरवठा लवकरच सुरळीत होणार आहे. याबाबत माहिती समोर आली आहे.