Dussehra Fashoin Tips: Sakal
लाइफस्टाइल

Dussehra Fashoin Tips: यंदा महानवमी अन् दसऱ्याला 'या' पद्धतीने करा तयारी, सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील

Dussehra Fashoin Tips: यंदा नवमी आणि दसऱ्याला खास सुंदर आणि स्टायलिश लूक हवा असेल तर बॉलिवूड अभिनेत्रींकडून मेकअप आणि आउटफिटची कल्पना घेऊ शकता.

पुजा बोनकिले

Dussehra Fashoin Tips: शारदीय नवरात्री सणाला सुरूवात झाली आहे. आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे. सर्वत्र भक्तीमय वातावरणा पाहायाला मिळत आहे. संध्याकाळी देवीची आरती झाल्यावर अनेक लोक दांडिया आणि गरबा खेळायला जातात.

सणासुदीच्या काळात महिला सर्वाधिक उत्साही असतात, कारण यावेळी त्यांना सुंदर कपडे आणि मेकअप करायाची संधी मिळते. आता महानवमी आणि दसरा येणार आहे,तेव्हा खास पद्धतीने तयारी करू शकता.

अनेक महिला कोणते कपडे घालावे याबाबत गोंधलेल्या असतात. यामुळे आज आम्ही तुम्हाला महानवमी आणि दसऱ्याच्या वेळी कोणता आउटफिट घालू शकता आणि कोणता मेकअप करू शकता हे सांगणार आहोत.

हेअर स्टाईल करावी

एक काळ होता जेव्हा महिलांना केस मोकळे ठेवणे आवडत होते. परंतु आज महिलांना हेअरस्टाइल करायला आवडते. तसेच केसांमध्ये गजरा आणि गुलाबाचे फुल लावायला आवडते. तुम्ही ट्रेंडी हेअरस्टाईळ करू शकता. ज्यामुळे तुमचा लूक अधिक सुंदर दिसेल. तसेच केसांमध्ये दागिने देखील लावू शकता.

लाल साडी

पूजेच्या वेळी महिला लाल साडी नेसणे पसंत करतात. तुम्ही महानवमी आणि दसऱ्याच्या पूजेसाठीही लाल रंगाच्या साडीची निवडू शकता. या प्रकारची साडी तुमचा लुक सुंदर बनवेल. दागिने, बांगड्या, कानातले सह तुमचा लूक पूर्ण करू शकता.

बिंदी किंवा नथ

जर तुम्ही विवाहित महिला असाल तर दसरा आणि महानवमीच्या पूजेदरम्यान तुम्ही बिंदी किंवा नथ घालू शकता. अविवाहित महिला देखील नथ घालू शकतात. यामुळे तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडेल.

लहेंगा घालू शकता

जर तुम्हाला साडी नेसायची नसेल तर सुंदर लेहेंगा परिधान करू शकता. पूजेदरम्यान हलक्या फॅब्रिकचा लेहेंगा घालून तुम्ही स्टायलिश दिसू शकता. यासोबत फुल स्लीव्ह ब्लाउज घाला आणि दुपट्टा एका बाजूला घेऊ शकता.

लाइट मेकअप

आजकाल लाइट मेकअप करण्याचा ट्रेंड आहे. तुम्ही विचार न करता पूजा लुकसाठी असाच न्यूड मेकअप कॅरी करू शकता. जर तुम्हाला न्यूड मेकअप आवडत नसेल तर तुम्ही फिकट गुलाबी शेडचा मेकअप करू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT