E-Challan Scam esakal
लाइफस्टाइल

E-Challan Scam : तुमचं अकाऊंट रिकामं करण्याचा नवा स्कॅम; E-Challan भरण्याच्या मेसेजवर चुकूनही क्लिक करू नका, नाहीतर...

वाहनांचे ई-चलन भरण्याच्या प्रयत्नात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे

Pooja Karande-Kadam

E-Challan Scam : सुमित तसा कसदार ड्रायव्हर आहे. तरीदेखील नजर चुकीने त्याने ट्राफिक सिग्नल मोडला. हे त्याच्याही लक्षात आलं नाही. पण, नंतर E-Challan चा मेसेज त्याला आला. त्याने मेसेज वाचला आणि चलन भरण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक केलं. त्या लिंकवर क्लिक करून त्याने बँकेचे डिटेल्स भरले. आणि चलनची रक्कमही ऑनलाईन ट्रान्सफऱ केली.

जेव्हा दुसऱ्या दिवशी त्याला मोबाईलवर मेसेज आला की त्याचं अकाऊंटमधील ४० हजाराचा बॅलन्स गायब झाला होता. तेव्हा त्याला काहीच समजलं नाही. पण नंतर लक्षात आलं की त्याचा फोन हॅक झालाय.

अनेकांना त्यांच्या वाहनांचे ई-चलन भरण्याच्या प्रयत्नात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वास्तविक, नुकतेच फ्रॉड ई-चलान लिंकद्वारे फसवणुकीचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे.

सायबर गुन्हेगार आता ई-चालानच्या माध्यमातून लोकांची फसवणूक केली जात आहे. अलीकडेच अनेकांना त्यांच्या मोबाईलवर ई-चलन संदेश प्राप्त झाले आहेत. या मेसेजमध्ये त्याच्या कारच्या चलनाच्या माहितीसोबतच चलन भरण्याची लिंकही देण्यात आली होती.

या लिंकवर क्लिक केल्याने लोकांची बँक खाती रिकामी होत आहेत.फरिदाबाद पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की, ई-चलानच्या नावाने आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. याबाबत, अधिका-यांनी सांगितले की फसवणूक करणारे या बनावट लिंकवर फक्त एका क्लिकने तुमचे बँक खाते हॅक करू शकतात.

ट्रॅफिक चालानसाठी अशी कोणतीही लिंक मिळाल्यास या लिंकवर क्लिक करू नका, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. ई-चलानची खरी लिंक आणि बनावट लिंक यातील फरकही पोलिसांनी सांगितला आहे.

स्कॅमर टेक्स्ट एसएमएसद्वारे लोकांना बनावट लिंक पाठवत आहेत. ही लिंक एकदम फेक आहे हे ओळखणे अवघड आहे. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांनी रचलेल्या जाळ्यात लोक अडकत आहेत.

लिंकवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला चलन भरण्यासाठी बँक खात्याची माहिती भरण्यास सांगितले जाते. हे कृत्य करणाऱ्या हजारो लोकांची बँक माहिती आता फसवणूक करणाऱ्यांच्या हाती लागली आहे.

बनावट ई-चलन कसे ओळखायचे:

खऱ्या ई-चालानच्या लिंकसोबत तुमचा वाहन क्रमांक आणि चेसिस नंबरही नोंदवलेला असतो. ई-चलन पेमेंट स्वीकारणाऱ्या खऱ्या लिंकच्या शेवटी ‘gov.in’ लिहिलेले असते, तर बनावट लिंकच्या शेवटी तुम्हाला फक्त ‘.in’ दिसेल.

फरीदाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, https://echallan.parivahan.gov.in/ ही केंद्र सरकारची अधिकृत ई-चलन पेमेंट लिंक आहे, तर https://echallan.parivahan.in/ ही लिंक मेसेजसह प्राप्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: फक्त 'या' कारणांमुळे सोन्याचे भाव कोसळले; आज काय आहे 24 कॅरेचा भाव?

Monsoon Kitchen Care: पावसाळ्यात स्वयंपाकघरातील दमटपणा कमी करायचाय? मग 'या' गोष्टी नक्की करा

Khadakwasla Dam: 1961 चा महापूर… पण खडकवासला धरण वाचलं कसं? अज्ञात इतिहास वाचा

Rain-Maharashtra Latest live news update: NDA कडून सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीचा अर्ज भरला

Asia Cup 2025 Explainer : श्रेयस अय्यरने आणखी काय करायला हवं? आगरकर म्हणाला, ना त्याची चूक, ना आमची...; मग दोष कुणाचा?

SCROLL FOR NEXT