easy and effective expert tips to remove holi colours naturally  
लाइफस्टाइल

Holi 2021 : रंगांपासून त्वचेची अन् केसांची घ्या काळजी; फॉलो करा डॉक्टरांनी सांगितलेल्या टीप्स

शर्वरी जोशी

रंगांची उधळण करणारा सण म्हणजे होळी.  रंगपंचमीच्या दिवशी वापरण्यात येणाऱ्या रंगांमध्ये बरेचदा रासायनिक पदार्थांची भेसळ करण्यात आलेली असते. या रासायनिक घटकांमुळे त्याचे त्वचेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. हे परिणाम टाळण्यासाठी प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. केमिकलयुक्त रंगांमुळे त्वचेच्या विविध समस्या उद्भवू शकतात जसे की त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर डाग पडणे, लालसरपणा या त्वचेशीसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रंगपंचमी खेळण्यापूर्वी आणि खेळल्यानंतर विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. होळीसाठी त्वचेची काळजी घेणे खरोखरच सोपे आहे. त्यामुळे हे उपाय कोणते ते पाहुयात.

होळी खेळण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी

१. केसांना चांगले तेल लावा. रंग खेळण्यापूर्वी नारळाच्या तेलाचे काही थेंब कोरफडीच्या गरामध्ये मिसळा हे मिश्रण केसांवर लावा.

२.  चांगल्या प्रतीचे मॉइश्चरायझर किंवा तेल वापरा. आपण आपल्या चेह-यासाठी नारळाचे तेल किंवा एरंडेल तेल देखील वापरू शकता.

३. जेल बेस सनस्क्रीन वापरा आणि बाहेर पडण्यापूर्वी 15 मिनिटे सनस्क्रीन लावा.

४. होळीचा रंग त्वचेच्या थेट संपर्कात येऊ नये यासाठी ओठांवर, नखांवर आणि डोळ्याभोवती व्हॅसलीन पेट्रोलियम जेलीचा एक थर लावा.

५. डोळ्याचे रक्षण करण्यासाठी तसेच सूर्यप्रकाशापासून बचाव करणयासाठी चष्म्याचा वापर करा.

६.त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पित रहा.

७.  केस लांब असतील तर ते वर बांधा अथवा स्कार्फने झाकून ठेवा.

रंग खेळून आल्यानंतर घ्या ही काळजी 

१. त्वचेरील रंग काढण्यासाठी त्वचा घासू नका. तर सौम्य क्लिंझरने ती स्वच्छ करा.

२. शॅम्पू किंवा साबण वापरण्यापूर्वी टाळू आणि त्वचेवरील संपूर्ण रंग धुवून घ्या.

३. आंघोळ केल्यावर चेह-यावर मॉइश्चरायझर आणि केसांना सीरम लावा.

४. केस पूर्णतः कोरडे करा.

५. होळी उत्सवानंतर किमान आठवडाभर स्पा किंवा अन्य उपचार करणं टाळा.

( लेखिका डॉ. रिंकी कपूर या द एस्थेटिक क्लिनिकमध्ये त्वचाविकार तज्ज्ञ आहेत.)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur GST Office Fraud : जीएसटी कार्यालयातील शिपायाला भ्रष्टाचाराची चटक! जप्त मशिनरी स्क्रॅपच्या टेंडर देतो म्हणून तब्बल ४५ लाखांना लावला चुना

HSC Exam Hall Ticket : बारावीच्या परीक्षेचे काऊंटडाऊन सुरू! प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध; 'असे' करा डाऊनलोड

Dombivli: डोंबिवलीत रक्तरंजित राडा! भाजपच्या महिला उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला, शिंदे गटाच्या उमेदवारांसह 8 जणांवर गुन्हा दाखल

एका दिवसात दोन्ही मुली गेल्या.... मराठी अभिनेत्रीने सांगितला वाईट काळ; म्हणाली, 'माझ्या सासू-सासऱ्यांनीही...'

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पुण्यात सभा

SCROLL FOR NEXT