लाइफस्टाइल

बुकीश :  ८४, चेरिंग क्रॉस रोड

माधव गोखले

‘फ्रॅंक डोएल, पुस्तकांच्या एखाद्या दुकानात एका जुन्या ग्रंथाची पानं दुसरं एखादं पुस्तक पॅक करण्यासाठी वापरली जातात तेव्हा आपण एका बिघडलेल्या, विध्वंसक आणि अधःपतित काळात राहत असतो, इतकंच मी म्हणेन... आणि तुम्ही त्या ग्रंथातलं एक महत्त्वाचं युद्ध मध्येच फाडलंय. ते कोणतं युद्ध होतं तेही मला माहिती नाही...’

‘... तुम्ही असं का नाही करत, ते पुस्तक पाठवताना पान क्रमांक LCXII आणि LCXIII (६२ आणि ६३) मध्ये बांधून पाठवा, म्हणजे निदान ते कोणतं युद्ध होतं आणि कोण जिंकलं एवढं तरी मला कळेल.’

एका पुस्तकवेड्या अमेरिकन लेखिकेने लंडनमधल्या जुन्या आणि दुर्मीळ पुस्तके विकणाऱ्या पुस्तकांच्या दुकानाच्या व्यवस्थापकाला लिहिलेल्या पत्रातला हा मजकूर आहे.

‘मी न्यूयॉर्कमध्ये जिथं राहते तिथून शहरातल्या सतराव्या रस्त्यावरील पुस्तकाच्या दुकानात जाण्यापेक्षा मला लंडन अधिक जवळ आहे, कारण माझ्या टाइपरायटर समोरून उठण्याचीही तसदी न घेता मला अधिक चांगली आणि सुबक पुस्तकं मागवता येतात,’ असं सांगणारा हेलन हान्फ आणि लंडनमध्ये ८४, चेरिंग क्रॉस रोड या पत्त्यावरच्या मार्क्‍स ऍन्ड कंपनी या जुनी, दुर्मीळ पुस्तकं वाचकांना मिळवून देणाऱ्या पुस्तकाच्या दुकानादरम्यानचा हा पत्रव्यवहार तब्बल साडेएकोणीस वर्षे सुरू होता. या पत्रव्यवहाराचं पुस्तक म्हणजे ‘८४, चेरिंग क्रॉस रोड’. पत्रव्यवहारावर आधारित पुस्तके ही काही नवलाई नाही; पण एकमेकांना कधीही न भेटलेल्या दोन व्यक्तींमधल्या पत्रव्यवहाराचं हे पुस्तक मात्र वाचकाला नवलाईच्या दुनियेत घेऊन जातं. हेलन हान्फ नाटककार होत्या. ‘माझी नाटकं निर्मात्यांना आवडतात; पण प्रत्यक्ष रंगमंचावर आणावीत एवढी काही ती त्यांना आवडत नाहीत,’ असं त्या स्वतःच मार्क ऍन्ड कंपनीमधल्या सिसिलीला, त्यांच्या न पाहिलेल्या मैत्रिणीला सांगतात. या मैत्रीचीही एक कथा आहे. पुस्तकांची मागणी करणारी पत्रं जायची ती कंपनीचा व्यवस्थापक असलेल्या एफपीडी किंवा फ्रॅंक डोएलकडं. सिसिली आणि तिच्या अन्य सहकाऱ्यांनाही न्यूयॉर्कमधल्या या पत्रलेखिकेबद्दल कुतूहल आहे. फ्रॅंकच्या नकळत सिसिली हेलनना पत्र लिहिते. कारण, कंपनीतल्या इतरांच्या मते, हेलनबरोबर पत्रव्यवहार हा आपला व्यक्तिगत अधिकार आहे, असं फ्रॅंकनं ठरवलं आहे.

मार्क्स आणि कंपनीचं पुस्तकांचं दुकान आता चेरिंग क्रॉस रोडवर नाही. दुकानाची इमारत डिसेंबर १९७०मध्ये रिडेव्हलपमेंटला निघाल्यावर दुकान बंद झालं. नंतरच्या काळात तिथे वेगवेगळी रेस्टॉरंट आली; पण तिथल्या एका खांबावर एक फलक कायम राहिला. -‘‘हेलन हान्फ यांच्या पुस्तकामुळे जगप्रसिद्ध झालेलं मार्क्स आणि कंपनीचं पुस्तकाचं दुकान इथं होतं.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT