drinking
drinking 
लाइफस्टाइल

रोज दारू पिणाऱ्याने महिनाभर सोडली तर शरीरावर काय परिणाम होतो?

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही हे नेहमी ऐकले असेल ती दारू पिणे आरोग्यासाठी घातक (Alcohol Side Effects)आहे. पण हा इशाऱ्याकडे खूप कमी लोक लक्ष देतात. दारु पिणाऱ्यांना जर तुम्ही फायदे विचारले तर १० फायदे सांगतील, पण दारुमुळे होणारे नुकसान मात्र दुर्लक्षित करतात. सध्या एका संशोधनाअंतर्गत असा दावा केला आहे की, एका महिना दारु न पिल्यास (Effect of qutting alcohol for 1 month) रोज दारु पिणाऱ्यांच्या आरोग्यामध्ये बदल होतात. हे बदल ऐकून तुम्ही थक्क व्हाल

प्रायरी ग्रुपच्या एक्सपर्टने दावा केला आहे की, जर एक महिन्यासाठी (Quit Alcohol for 1 month) दारू पिणे सोडले तर शरीर पूर्ण पणे बदलून जाते. हा खुलासा 'ड्राय जानेवरी' (Dry January) मोहिमेअंतर्गत करण्यात आला आहे. या मोहिमेनुसार लोकांना जानेवारी महिन्यामध्ये दारु पिऊ नये यासाठी जागरुक केले गेले. यूरोप आणि अमेरिकेमध्ये हे जास्त करुन पाळले जाते.

पहिला आठवडा

एक्सपर्टनुसार, जर तुम्ही रोज दारु पीत असाल तर पहिल्या आठवड्यात तुम्ही पुन्हा दारु पिण्याची शक्यता आहे. दारू पिण्याच्या इच्छेवर नियंत्रण मिळवणे अवघड आहे. जर कोणी एका आठवड्यामध्ये दारू पीत नाही त्याला जाणवेल की त्याची झोपण्याच्या वेळेत बदल (Sleep Regulate After Quitting Alcohol) झाला आहे. दारु पिण्यामुळे लगेच झोप येते. अशावेळी दारू सोडल्यानंतर एका आठवड्यामध्ये झोप येणे अवघड असते, पण ती गाढ आणि चांगली झोप असेल. एका आठवड्यामध्ये जास्त हायड्रेटेड (Body Hyderated After Quitting Alcohol) झाल्याचे जाणवेल कारण, वाईनचे ६ ग्लास प्यायल्यास १९-२० ग्लास पाण्याची कमतरता शरीरामध्ये जाणवते. पहिल्या आठवड्यात तुम्ही कमी जंक फूड खाता आणि जेवणामध्ये सुधारणा होईल.

दुसरा आठवडा

दोन आठवडे दारू सोडल्यामुळे तुम्हाला चांगली झोप आणि हायड्रेट राहण्याचा परिणाम दिसून येईल. तुम्हाला उत्साही असल्याचे जाणवेल आणि तुमची स्कीन जी आधी सुजल्यासारखी दिसत होती ती चांगली दिसेल. जर तुम्हाला गॅस किंवा अॅसेडिटीची समस्या असेल तर ती दोन आठवड्यात ठीक होईल.

Government Scheme : पती-पत्नीला महिना 10,000 रुपये पेन्शन, जाणून घ्या स्किमतिसरा आठवडा

तिसऱ्या आठवड्यामध्ये तुमचा रक्तदाब कमी होऊ लागेल आणि स्थिर होत जाईल. इतकेच नव्हे तर तुमच्या खूप कॅलरीज् देखील कमी होतील ज्यामुळे तुम्ही खूप बारीक दिसण्यासोबतच फिट देखील रहाल. ६ ग्लास वाईन पिण्यामुळे व्यक्तीच्या शरीरामध्ये ३००० कॅलरीज वाढतात.

चौथा आठवडा

चौथा आणि शेवटच्या आठवड्यात तुमची स्किन खूप चांगली होईल, ती आधी पेक्षा चांगली दिसू लागेल. चेहऱ्यावरील एक्ने आणि ड्रायनेस कमी होईल. इतकेच नाही, जर तुम्ही रोज दारू पिणारी व्यक्ती असाल तर तुमचे खूप पैसे देखील वाचतीलय. तुमचा मूड चांगला होईल आणि उर्जा असल्याचे जाणवेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT