Calligraphy Sakal
लाइफस्टाइल

भावना अशा करा व्यक्त! कॅलिग्राफीसह हटके पद्धतीने होईल मन मोकळं; जाणून घ्या!

हटके अंदाजात तुम्हाला स्वतःच्या भावना इतरांपर्यंत पोहोचवायच्या असतील, तर कॅलिग्राफी उत्तम पर्याय आहे.

केतन पळसकर : सकाळ वृत्तसेवा

कुणाचीही कॉपी केलेलं नसेल, पूर्वी कुठेच पाहिलेलं नसेल अशा तुमच्या हटके अशा निरनिराळ्या अंदाजात तुम्हाला स्वतःच्या भावना इतरांपर्यंत पोहोचवायच्या आहेत? शब्द तुमचे असतील तर उत्तमच. पण, तुम्हाला लिहिता येत नसेल तरही चालेल. भावना महत्त्वाच्या. फक्त त्यासाठी कॅलिग्राफर (सुलेखक)ला सांगा. तो शब्दांत उतरवून त्याला कॅलिग्राफीमध्ये (सुलेखन) नटवून, सजवून हटके स्वरूपात डिजिटल इमेज तयार करून देईल.

कॅलिग्राफीत काय काय करता येईल?

तुमच्या स्वतःच्या अगदी वेगळ्या अशा रुबाबात सोशल मीडियावर कुणाला तुमच्या शुभेच्छा द्यायच्या असतील. गोडी-गुलाबीने सॉरी म्हणायचे असे, आई-वडील, मित्र, भाऊ, बहिणीची क्षमा मागायची आहे, आभार मानायचे आहे, कुणाच्या दुःखात सहभागी व्हायच आहे, नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे, व्यवसायाची जाहिरात करायची आहे, पत्रिका छापून हव्या आहेत, वर-वधूंची नावे लिहायची आहे, पुस्तकांचे मुखपृष्ठ सजवायचे आहे, तुम्ही काढलेल्या किंवा स्वतःच्या फोटोवर काही लिहायचे आहे इत्यादी काहीही असले तरी तुमचे म्हणणे थोडक्यात मांडा. त्याचे कॅलिग्राफीतून एका सुंदर इमेजमध्ये रुपांतर होईल. (Express feelings like this! With calligraphy, the mind will be free; Find out!)

कवी, गझलकारांना उपयोग:

फेसबुक, व्हाट्सॲप सारख्या सोशल मीडिया साईट्सचा जन्म झाल्यापासून शीघ्रकवींच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे, तुमची शब्दरचना, कविता, शेर, गझल गाजते. यातून तुमची लोकप्रियता जगभर वाढते. नवे वलय प्राप्त होते. अशा नव कवींनी या हटके कलेचा वापर केल्यास त्यांना प्रस्तुतीसाठी नक्कीच फायदा होईल.

सुंदर हस्ताक्षर आणि कॅलिग्राफीतील फरक:

‘कॅलिग्राफी’चे मूळ हस्ताक्षर सुंदर असण्यात आहे. हस्ताक्षर वळणदार असेल तर कॅलिग्राफी अवघड नाही. यात शब्द किंवा अक्षर किती वळणदार आणि आकर्षकपणे मांडले जातात यावर कॅलिग्राफी ठरते. यासाठीही नियमित सराव आवश्यक आहे. मात्र, ठरवले तर कॅलिग्राफी करणे अवघड नाही.

कॅलिग्राफीचे फायदे काय?

या डिजिटल इमेज तुम्ही व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, जीमेल आदी सोशल मीडियामध्ये सर्वत्र वापरू शकता. डीपी, प्रोफाइल पीक, कव्हर फोटो काहीही असले तरी तिथे ही कॅलिग्राफी सर्वांचे आकर्षण नक्कीच ठरेल. आपले मित्र मैत्रिणी, नियमित वाचक, काव्यरसिक या इमेजेस सेव्ह करून ठेवतात, व्हायरल करतात. त्यामुळे, तुम्हाला अनेक लाभ होतीलच.

फोटोग्राफीलाही उपयोगी:

अल्बम डिझाईनमध्ये, एन्लार्जमेंटमध्ये, व्हिडीओ, ग्राफिक्स डिझाईनमध्ये, फोटो किंवा पेजला अनुरूप अशा ओळी, गाणी, कविता, चारोळी तुमचे मूल्य वाढवतात. त्यामुळे, फोटोग्राफर देखील या कलेचा उपयोग करीत आपल्या फोटोग्राफीला नव्या उंचीवर नेऊ शकतो. तसेच, ग्राहकाच्या संग्रही असलेल्या या फाइल्स कितीही वेळा वापरू शकता. या कलेत अक्षर तसेच शब्दसंख्येवर दर अवलंबून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT