Face Cleanser esakal
लाइफस्टाइल

Face Cleanser : फेस क्लिंझर निवडताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या, नाहीतर होईल मोठं नुकसान

अनुभवी ब्युटिशीयन पूजा गोयलकडून फेस क्लिंझर निवडताना कोणती विशेष काळजी घ्यायची ते जाणून घेऊया.

साक्षी राऊत

Face Cleanser : सकाळी उठून जवळपास प्रत्येकजण आधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुतो. त्यासाठी बहुतेक लोक फेस क्लिंझर वापरतात. मात्र काही लोक त्यांचा फेस टाइप जाणून न घेता कुठलेही क्लिंझर वापरतात. स्किन टाइपसोबतच क्लिंझर निवडताना अनेक गोष्टींकडे लक्ष द्यायला लागते. चला तर अनुभवी ब्युटिशीयन पूजा गोयलकडून फेस क्लिंझर निवडताना कोणती विशेष काळजी घ्यायची ते जाणून घेऊया.

१. स्किन टाइप ओळखा

फेस क्लिंझर निवडताना, तुम्हाला तुमच्या स्किन टाइप माहित असणे आवश्यक आहे. त्वचेचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये ऑयली,नॉर्मल, ड्राय आणि सेंसिटिव्ह त्वचा समाविष्ट आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा स्किन टाइप लक्षात घेऊन फेस क्लिंझर खरेदी करावे. यामुळे त्वचेला अधिक फायदा होतो. सर्व प्रकारच्या त्वचेच्या लोकांसाठी फेस क्लिंझर बाजारात उपलब्ध आहे.

संवेदनशील त्वचेसाठी मऊ आणि सौम्य क्लीन्सर वापरणे आणि पिंपल असलेल्या त्वचेसाठी सॅलिसिलिक ऍसिड असलेले क्लीन्सर वापरणे बेस्ट ठरेल. त्याच वेळी, जर तुम्हाला त्वचा हायड्रेटेड ठेवायची असेल, तर तुम्ही हायलुरॉनिक अॅसिड असलेले क्लिंझर निवडू शकता.

२. फ्रॅग्रंस फ्री क्लिंझर निवडा

फ्रॅग्रंसुक्त क्लिंझर चेहऱ्याच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात. अशा परिस्थितीत, तुम्ही नेहमी फ्रॅग्रंस फ्री क्लिंझर क्लिन्जर निवडा. ज्या क्लिंझर्समध्ये सुगंध असतो ते त्वचेला हानी पोहोचवू शकतात. सुगंधित क्लिंझरमुळे त्वचेवर जळजळ आणि पुरळ येऊ शकतात. विशेषत: संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी नेहमी फ्रॅग्रंस फ्री क्लिन्झर वापरावे. सल्फेट्स आणि पॅराबेन्स असलेले फेस क्लिन्झर वापरणे टाळा.

३. नॅचरल इंग्रेडियंट्स असणारे क्लिंझर वापरा

क्लिंझर अनेक प्रकारचे असतात. अनेक क्लिंझरमध्ये केमिकलचे प्रमाण जास्त असते. जे त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. त्वचेला सुरक्षित ठेवण्यसाठी कायम नॅचरल इंग्रेडियंट्सयुक्त क्लिंझर वापरा. अॅलोव्हेरा किंवा गुलाब जलयुक्त क्लिंझर निवडावे.

४. व्हिटॅमिनयुक्त क्लिंझर निवडा

व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई त्वचेसाठी फायदेशीर आहे, जे अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करतात. व्हिटॅमिन सी आणि ई त्वचेचे पोषण करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, फ्री रॅडिकलपासून त्वचेचे संरक्षण करते. अशा स्थितीत तुम्ही अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेले क्लिन्झर निवडा.

5. एक्सफोलिएटिंग एजंटसह क्लिंझर निवडा

चेहरा चमकदार ठेवण्यासाठी, लोक अनेकदा त्यांची त्वचा एक्सफोलिएट करतात. अशा परिस्थितीत तुम्ही एक्सफोलिएटिंग फेस क्लिन्जर निवडू शकता. या फेस क्लिंझरचा वापर केल्याने, तुमच्या त्वचेवर जमा झालेली सर्व घाण आणि डेड स्किन सेल्स सहज काढल्या जातील. यामुळे त्वचा अतिशय स्वच्छ आणि निखळ दिसू लागेल.

फेस क्लिन्जर घेताना या गोष्टी लक्षात ठेवा

हार्श क्लिंझर खरेदी करणे टाळा. यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते.

तसेच सल्फेट असलेले क्लिंझर वापरणे टाळा. सल्फेट त्वचेचे पोअर्स बंद करू शकते. यामुळे मुरुमांची समस्या उद्भवू शकते.

क्लिंझर वापरल्यानंतर तुम्हाला त्वचेवर खाज किंवा जळजळ होत असेल तर ते वापरणे बंद करा.

चेहऱ्यावर नेहमी नैसर्गिक क्लिंझरचाच वापर करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी, जय पवार म्हणाले, बिनविरोधसाठी आमचा प्रयत्न पण...

IPL 2026 : शाsssणा... Rohit Sharma ने कुलदीप, लोकेश यांना 'मामू' बनवलं; प्रसंग सांगताना हिटमॅन खळखळून हसला Video

Latest Marathi News Live Update : मुंबईहून 18 टन ऑटो LPG संभाजीनगरमध्ये जाणार

MI vs DC Live : सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, नमन धीरने मुंबई इंडियन्सची लाज वाचवली; दिल्लीच्या गोलंदाजांसमोर इतरांची शरणागती

"मी पैशांसाठी बिग बॉस केलं" लपंडाव फेम रुपालीचा धक्कादायक खुलासा ; म्हणाली..

SCROLL FOR NEXT