Face Feature Astrology esakal
लाइफस्टाइल

Face Feature Astrology: महिलांमध्ये असलेली ही सौंदर्य वैशिष्ट्ये ठरू शकतात आयुष्यातील भरभराटीचं कारण

अशा गुणांच्या महिला नेमक्या कशा असतात व त्यांच्यात कोणते गुण असतात ते जाणून घेऊया

साक्षी राऊत

Women Beauty Features: काही महिलांचा पायगुण फार शुभ असल्याचे मानले जाते. या महिला ज्यांच्याही आयुष्यात जातात त्यांच्या आयुष्यात आणखी भरभराट होते. महिलेतील काही गुण अनेकांसाठी शुभ ठरतात. अशा गुणांच्या महिला नेमक्या कशा असतात व त्यांच्यात कोणते गुण असतात ते जाणून घेऊया.

ज्या महिलांचे दात सुंदर, चमकदार, शुभ्र आणि पुढच्या दिशेस झुकलेले असतात अशा स्त्रिया अत्यंत भाग्यशाली असतात. अशा महिलांचं जीवन राजेशाही असतं. हसताना ज्या महिलेचे दात दिसत नाही, गाल फुगीर दिसतात आणि डोळे मिटत नसतील तर ही लक्षणे अतिशय शुभ मानली जातात. अशा महिलांचा पायगुण तुमच्या भरभराटीचंही कारण ठरू शकतं.

ज्या महिलांचा गळा चार बोटांएवढा लांब असतो आणि त्यावर तीन रेषा पाहायला मिळतात अशा महिला अतिशय भाग्यवान असतात. अशा महिला धनवान देखील असतात असं बोललं जातं. सोबतच सुंदर आणि गोल आकाराचा गळा महिलांसाठी अत्यंत शुभ मानला जातो. (Lifestyle)

मऊ आणि गोलाकार हनवटी असलेल्या मुली किंवा महिला शुभ असल्याचे मानले जाते. एखाद्या महिलेची हनवटी खालील ओठांच्या बाजूने झुकली असल्यास अशा महिलांना फार भाग्यशाली असल्याचे मानले जाते.

तांब्यासारखी लाल दिसणारी, लांब, सरळ, पातळ जीभ असणाऱ्या महिलांचं जीवन अतिशय सुखद असतं. अशा महिला ज्या घरात जातात तेथे भराभराट येते. अशा महिलांना कुठल्याच गोष्टीची कमतरता जाणवत नाही.

गोल आणि हलक्या पिवळ्या रंगाच्या गालाच्या महिला अत्यंत लकी असतात. अशा महिलांचं ज्याही पुरुषांसोबत लग्न होतं त्यांचं भाग्य उजळतं. परिणामी त्यांच्या आयुष्यात शुभकाळ सुरू होतो.

(Disclaimer: इथे दिलेली ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. सर्वसामान्य आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. सकाळ समुह यांसारख्या गोष्टींना प्राधान्य देत नाही)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tenth Schedule म्हणजे काय? राहुल नार्वेकरांच्या निकालावर कपिल सिब्बलांचा एकच मुद्दा ठरणार गेम चेंजर?

Gold Silver Price Today : शेअर बाजार सुरू होताच सोने-चांदीच्या दरात घसरण; कालच्या तुलनेत किती बदल?

IND vs SL 1st Test: भारताच्या विजयी मार्गात विघ्न! गॉल मैदानावरून चिंता वाढवणारी बातमी; नेमकं काय झालंय?

Maratha Youth: मराठा तरुणांसाठी दिलासा! महामंडळाच्या कर्ज योजनेतील अटी लवकरच शिथिल होणार; ८०० कोटींचा निधी मागणार

Judicial Employees Protest: न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा लवकरच एल्गार; राज्यातील ३४ हजार कर्मचारी समान वेतनासाठी एकवटणार

SCROLL FOR NEXT