Fashion Tips  Esakal
लाइफस्टाइल

Fashion Tips: एकच स्टाइल करून बोअर झालाय? ट्रॅडिशनल वेअरला असा द्या फ्युजन टच!

तुम्हाला पारंपारिक लूक तर मिळेलच शिवाय तूमचा लुक वेगळा आणि स्टायलिशही दिसेल

सकाळ डिजिटल टीम

लग्नसराईत कोणताही लग्नसमारंभाला उपस्थिती लावताना नेहमी ट्रॅडीशनल लुक केला जातो. कारण, लग्न हा एकच असा फंक्शन आहे जिथे तरूणींना वेस्टर्न काही चालत नाही. त्यामूळे साडी, अनारकली, स्कर्ट असे कपडे लग्नात घातले जातात. परिस्थितीत प्रत्येकाला या खास प्रसंगी स्टायलिश तसेच सुंदर दिसण्याची इच्छा असते.

जर तुम्हाला त्याच जुन्या स्टाइलची साडी आणि लेहेंगा घालण्याचा कंटाळा आला असेल. तर आज आम्ही अशाच काही आउटफिट्सबद्दल सांगणार आहोत, जे परिधान केल्याने तुम्हाला पारंपारिक लूक तर मिळेलच शिवाय तूमचा लुक वेगळा आणि स्टायलिशही दिसेल.

धोती साडी

आजकाल साड्यांमध्ये धोती साडीचा खूप ट्रेंड आहे. हे परिधान केल्याने तुम्ही स्टायलिश तर दिसताच पण पारंपारिक लूकपेक्षाही खूप वेगळे दिसाल. ही दिसायला नऊवारी साडीसारखीच असते. पण, साध्या सॅटिन फॅब्रिकच्या साडीसोबत तुम्ही हेवी वर्क ब्लाउज कॅरी करू शकता. यासोबतच केस मोकळे ठेवून तुम्ही परफेक्ट लूक देऊ शकता.

स्कर्टसोबत प्लजिंग नेकलाइन

जर तुम्हाला लेहेंगा घालायचा असेल तर तुम्ही त्याची वेगळी स्टाइल फॉलो करू शकता. यासाठी, तुम्ही हेवी वर्क असलेला लांब स्कर्ट प्लंगिंग डीप नेकलाइन ब्लाउज घालू शकता. सामान्य लेहेंग्यापेक्षा वेगळा लुक देताना ते तुम्हाला स्टायलिश देखील बनवेल. हा ड्रेस तुम्ही बाजारातून खरेदी करू शकता. याशिवाय, तुम्ही ते स्वतः कस्टमाइज देखील करू शकता.

प्लाझो सेट

प्लाझो सेटमध्येही तुम्हाला वेगळा आणि स्टायलिश लूक मिळवायचा असेल तर तुम्ही मोठ्या आकाराच्या पलाझोसोबत ब्लेझर डिझाईनचा कुर्ता घालू शकता. हा आउटफिट तुम्हाला खूप क्लासी लुक देईल.

प्लाझो विथ श्रग

शरारा गेल्या काही काळापासून मुलींमध्ये ट्रेंडमध्ये आहेत. पण तुम्हाला त्याच जुन्या स्टाइलचे प्लाझो घालण्याचा कंटाळा आला असेल.तर तुम्ही त्याचे फ्यूजन व्हर्जन वापरून पाहू शकता. यासाठी पलाझोसोबत श्रग घालावे लागेल. याच्या मदतीने तुम्ही वरून श्रग घेऊन याला पारंपारिक टच देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT