Fashion Tips
Fashion Tips Esakal
लाइफस्टाइल

Fashion Tips : पीरिअड्समधील अवघडलेपण सोडा; या टिप्सने दिसा फॅशनेबल अन् रहा कंफरटेबल!

सकाळ डिजिटल टीम

Fashion Tips: मासिक धर्म, पाळी, पीरिअड्स हे शब्द कानावर पडले की तरूणींना त्या चार दिवसाची आठवण होते. प्रत्येकीला त्या दिवसात अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. कोणाचे पोट, पाठ दुखते तर कोणाचा रक्तस्त्राव जास्त होतो. तर कोणाला काहीच त्रास नसतो पण पीरिअड वेळेवर येत नाही किंवा ती जास्त दिवस असते. असे अनेकींचे प्रॉब्लेम्स आहेत.

पीरियड्स आहे म्हणून घरात कोंडून बसण्याचे दिवस आता गेलेत. महिला, तरूणी या समस्यांवर मात करत ऑफिस, कॉलेज,शाळा रोजची घरातली कामे करतात. कधी कोणाच्या कपड्यांवर डाग पडला असेल आणि त्यामूळे लोकांच्या  नजरेत आपण आलो असू तर तेही कायम लक्षात राहते. यामूळे पीरियड्समध्ये नेहमी डागांची काळजी घेत कपडे निवडावे लागतात.अशावेळी पीरियड्समध्ये सर्वात जास्त टेन्शन असते. ते काय घालायचे. विशेषतः ऑफिसला जाताना किंवा फंक्शनला जाताना. त्यामूळेच आज असे काही स्टायलिश आणि आरामदायी ड्रेस पाहुयात. जे तूम्हाला फॅशनेबल आणि कंफरटेबल रहायला मदत करतील.

ब्लॅक जंपसूट

पीरियड्सच्या काळात टाइट जीन्स घालावीशी वाटत नाही. त्यामूळे पार्टीला जाण्यासाठी तुम्ही रकुल प्रीत सिंहसारखा हा लूक करू शकता. ब्लॅक जंपसूट तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. यामध्ये तुम्हाला स्टाइलही करता येईल आणि आरामदायकही वाटेल. तुमचा लुक कंप्लिट करण्‍यासाठी जंपसूटवर स्टायलिश कानातले आणि परफेक्ट मॅचिंग शूज घाला.

टी शर्ट वाइड लेग्ड ट्राऊजर

तुम्ही रोज ऑफिसला जात असाल तर रोज प्रेझेंटेबल रहावे लागते. अशावेळी पीरियड्समध्ये काय घालावे हा मोठा प्रश्न असतो. अशावेळी असेल तर तुम्ही हा लूक पुन्हा तयार करू शकता.  तुम्हाला वाइड लेग्ड ट्राऊजर  आणि टी-शर्ट घ्यावा लागेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही क्रॉप टी-शर्ट किंवा ट्राउझर्ससह शर्ट देखील घालू शकता.

अनारकली सूट

पीरियड्समध्ये आराम मिळावा यासाठी तुम्ही अनुष्का शर्माचा हा लूक कॉपी करू शकता. जर तुम्हाला पार्टीला जायचे असेल तर तुम्ही एम्ब्रॉयडरी वर्क किंवा चमकदार अनारकली सूट निवडू शकता. त्याचबरोबर ऑफिससाठी सुती रंगाचा अनारकली सूट असेल तर तुम्ही तो घालू शकता. पीरियड्स दरम्यान हा ड्रेस कॅरी करायला सोपा आहे.

फ्लोरल प्रिंटेड साडी

जर तुम्हाला पीरियड्स दरम्यान एखादा फॅमिली फंक्शनला जायचे असेल तर तूम्ही साडी घालू शकता. जास्त हेवी डिझायनर साडी नको असेल तर शिल्पाची ही फ्लोरल प्रिंटेड पॅटर्न साडी तुम्हाला एक खास लुक देईल. तुम्ही ते दिवसा आणि रात्रीच्या दोन्ही फंक्शन्समध्ये कॅरी करू शकता.

चंदेरी सिल्क सूट

पार्टीचे प्लॅन केले असेल आणि अचानक तूम्हाला पिरिअड्स आले तर नाराज होऊ नका. दीपिकाचा हा लूक तुमचा तारणहार ठरू शकतो. जर तुमच्या वॉर्डरोबमध्ये चंदेरी सिल्क सूट असेल तर ते जड कानातले आणि केलांचा बन घालू शकता. यासोबत अतिशय लाइट न्यूड मेकअप ट्राय करा.

कफ्तान कुर्ता

मासिक पाळी दरम्यान ओटीपोटात वेदना होतात. अशावेळी कफ्तान कूर्त्यासारखे कपडे अधिक आरामदायक वाटू शकतात. तुम्हाला ऑफिस किंवा कोणत्याही पार्टीला जायचे असेल तर तुम्ही काफ्तान कुर्ता घालू शकता. हे कपडे घट्ट नसतात. त्यामूळे एक मोकळेपणा  येतो.

प्लेन मॅक्सी ड्रेस

जान्हवी कपूरच्या या प्लेन मॅक्सीसारखे तुम्ही पीरियड्स दरम्यान ऑफिस किंवा पार्टीसाठी तुमचा कोणताही प्लेन ड्रेस कॅरी करू शकता. हे सिंपल आणि ग्लॅमरस लुक देईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: मतदान केंद्राजवळील काँग्रेसचे बॅनर हटवले; पुण्यातील भाजपचं आंदोलन मागे

IPL 2024 Playoff Scenarios : RCB अन् CSK या दोघांनाही मिळू शकते प्लेऑफची तिकिटे? डोके शांत ठेवून समजून घ्या समीकरण

Motorcycle Fire Blast: बुलेटला लागलेली आग विझवताना झाला स्फोट, १० जण होरपळले.. अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Income Tax: आयकर विभागाने करदात्यांच्या सोयीसाठी सुरू केले नवीन फीचर; हे काम होणार एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : बारामतीतील ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाचे सीसीटीव्ही पुन्हा सुरू

SCROLL FOR NEXT