Fashion Tips esakal
लाइफस्टाइल

Fashion Tips : साडी नेसली की जाड दिसायला होत? मग या फॅब्रिकची निवडा साडी

साडी हा आपल्या भारताचा पारंपारिक पोशाख

सकाळ डिजिटल टीम

Fashion Tips : साडी हा आपल्या भारताचा पारंपारिक पोशाख आहे, छान चापून नेसलेली साडी, नाकात नथ आणि कपाळावर टिकली यात जे सौंदर्य आहे ते बाकी कशातच नाही. लग्न समारंभापासून ते ऑफिस पार्टीपर्यंत, तुम्ही कुठेही साडी नेसू शकतात. बर्‍याच स्त्रियांना साडी नेसायलाही आवडतही पण त्यात एक मुद्दा असतो तो म्हणजे साडी नेसली की मी जाड दिसते, साडी कितीही चापून नेसली तरी कधी कधी फुगतेच आणि तेव्हा जाड दिसायला होत.

अनेकदा काही बायका ह्या वजनाने लठ्ठ असतात, त्यामुळेही साडी नेसतांना बायका जाड दिसतात. अशा परिस्थितीत बायका साडी नेसण टाळतात, पण जर तुम्ही तुमच्या शरीराच्या प्रकारानुसार साडी निवडली तुम्हाला जाड जाड दिसायला होत नाही, उलट तुम्हाला ग्रेसफुल लुक मिळेल.

शरीराच्या प्रकाराव्यतिरिक्त, साडीचा प्रकार किंवा फॅब्रिकची निवड देखील जास्त वजन असलेल्या महिलांना स्लिम लुक देऊ शकते. स्लिम दिसण्यासाठी जास्त वजन असलेल्या महिला कोणत्या प्रकारची साडी घालू शकतात ते जाणून घेऊया.

म्हैसूर सिल्क साडी

तुमचे वजन जास्त असेल तर स्वतःसाठी म्हैसूर सिल्क साडी निवडा. त्याचे फॅब्रिक मऊ असते, ज्यामुळे शरीरावर साडी फुगल्या सारखं वाटतं नाही.

जॉर्जेट साडी

जॉर्जेटच्या साड्या जाड मुलींनाही सडपातळ दिसायला मदत करतात. मुळात ती हलक्या वजनाची असल्यामुळे सहज चापून नेसाता येते. जॉर्जेट साडीमध्ये बॉडीचा शेप चांगला दिसतो.

नेट साडी

नेटची साडी ही मुळात प्रत्येका बायकांची आवडती साडी आहे, वजनदार महिलांसाठी नेट किंवा टिश्यू फॅब्रिकची साडी हा देखील एक चांगला पर्याय आहे. या प्रकारच्या फॅब्रिकची साडी तुम्हाला एक वेगळा ग्लॅमरस लूक पण देतात.

रफल साडी

ज्या बायकांचं पोट मोठं आहे त्यांनी रफल साडी नेसावी. रफल साडी तुमच्या पोटाची चरबी लपवण्यास मदत करते. यासोबतच स्टायलिश लुकही मिळतो. साडीसोबत ब्लाउजची डिझाइन पण अशी ठेवा ज्याने तुम्हाला स्लिम दिसायला मदत मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT